शिरुर - रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी विद्युत डी. पी . तील कॉपरची चोरी करणा-या तीन जणाना केली अटक




शिरुर दिनांक (शंकर तिडके) रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी धडक कारवाई करत विद्युत डी.पी चे कॉपर चोरी करणा-या तीन जणांना अटक करुन 15 गुन्हे उघडकीस आणले आहेत. रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील खंडाळे, वाघाळे, गणेगाव खालसा, व रांजणगाव इत्यादी ठिकाणी इलेक्ट्रीक डि. पी. मधिल कॉपर चोरीचे सत्र मागील काही महिन्या पासुन चालु होते. सदर चोरी प्रकरणी पोलीस स्टेशनला वेळोवेळी वेगवेगळे गुन्हे अज्ञात आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आलेले आहेत. सदर चोरी प्रकरणांचा पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर यांनी गंभीर दखल घेवुन सदर चोरीचा छडा लावण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना दिलेल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी तपास पथकातील पोसई शिवाजी मुंढे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, विजय शिंदे, वैजनाथ नागरगोजे, संतोष औटी यांना सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या. तपास पथकाने सदर गुन्हा घडलेठिकाणांना भेटी देवून तांत्रीक माहितीच्या व गोपनिय माहितीच्या आधारे गुन्हयांची उकल करण्याचा कसोशिने प्रयत्न करत असतांना पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना त्यांच्या खास गोपनिय बातमीदारा मार्फत अशा प्रकारचे रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हे करणा-या आरोपींबाबत माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार त्यांनी तपास पथकासह सापळा लावुन काही संशयीत आरोपीना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता तसेच त्यांनी पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी सदर गुन्हयांची कबुली दिली आहे. सदर चोरी प्रकरणी आरोपी 1 ) ईस्लाम शामद शेख वय 30 वर्षे, (2) वाल्मिक किसन कवडे वय 30 वर्षे, दोन्ही रा चितेगाव ता पैठण जि औरंगाबाद ( 3 ) मजहर अजिजुला खान वय 34 वर्षे, कोराडी सहजापुर वाळुंज एमआयडीसी यांना अटक करण्यात आलेली आहे. या आरोपीनी रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील - 05, शिक्रापूर पोलीस स्टेशन मधील हद्दीत 4 राजगड पोलीस स्टेशन , हद्दीतील -3, शिरुर पोलीस स्टेशन हद्दीतेल 1सासवड पोलीस स्टेशन हदीतील असे एकुण 15 डीपी चोरींची गुन्हयाची कबुली दिली असुन त्यांचेकडुन 450 कि.ग्रॅ. तांब्याच्या तारा व कॉईल गुन्हयात वापरलेले वाहन पिकअप टेम्पो असा एकुण 8,00,000/- रु किमतीचा माल पोलीसांनी जप्त केला आहे. सदरची कामगीरी मा अंकित गोयल सो. पोलीस अधिक्षक सो.पुणे या मा. मितेश गट्टे सो. अप्पर पोलीस अधिक्षक पुणे मितेश गट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरुर यशवंत गवारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरडे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंडे, पोसई निळकंठ तिडके, पोसई विनोद शिंदे, पोसई शुभांगी कुटे, पोसई सुहास रोकडे, सहा. फौ. दतात्रय शिंदे. पो. कॉ. विजय शिंदे, पो.हवा. संतोष औटी, वैजनाथ नागरगोजे, पो हवा अभिमान कोळेकर, पो हवा कल्पेश राखोंडे, सहाय्यक फौज घारे, पो हवा गणेश आगलावे, विलास आंबेकर, पो.ना. माऊली शिंदे, पांडुरंग साबळे, माणिक काळुकूटे पो कॉ हेमंत ईनामे यांनी केली आहे. सदर गुन्हयांचापुढील तपास सहा. फौज. सुभाष गारे, पो हवा अभिमान कोळेकर, पो हवा कल्पेश राखोंडे, पो हवा गणेश आगलावे रांजणगाव हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post