पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या जोरदार कामगिरीमुळे आरोपींचे धाबे दणाणले
प्रतिनीधी
रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील औद्योगिक वसाहतीमध्ये पेप्सिको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी मधील स्टोर रूम मधील खिडकीचा कोंड्या तोडून खिडकी मधून आत प्रवेश करून 11,20,980रू किमतीचे चिप्स बनविण्यासाठी लागणाऱ्या मशीनचे साहित्य दी 19/12/2023 रोजी ते 20/12/2023 पर्यंत या दोन दिवसांमध्ये चोरीस गेले होते याप्रकरणी कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने प्रवीण अशोक बारी यांनी 23/12/2023 रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन कारेगाव या ठिकाणी तक्रार नोंदवली होती या तक्रारीची दखल घेऊन पोलीस स्टेशन मध्ये तात्काळ अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता
सदरचा गुन्हा दाखल होताच घटनेचे गांभीर्य ओळखून झालेल्या घटनेच्या ठिकाणी मा मितेश गट्टे अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत गवारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी तात्काळ भेट देऊन चोरीस गेलेल्या मालाचा व आरोपींचा शोध घेणे याबाबतच्या तात्काळ सूचना श्री महेश ढवण पोलीस निरीक्षक रांजणगाव यांना दिल्या या गुन्ह्याचा तपास तात्काळ व जलद गतीने लागण्यासाठी व हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तात्काळ स्वतंत्र पथकाचे नेमणूक केली
या पथकामध्ये सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे उमेश कुतवळ यांनी औद्योगिक वसाहती मधील व कारेगाव परिसरातील 30 ते 40 ठिकाणावरील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून आरोपी यांनी गुन्हा केल्यानंतर जाताना वापरलेल्या स्कूटी मोटरसायकल यांचा सीसीटीव्ही द्वारे पाठपुरावा केला तसेच गोपनीय माहितीच्या आधारे व तांत्रिक आधार घेऊन तपास पथकाने आरोपी विजय पांडुरंग पाटील वय वर्षे 36 राहणार मोरगाव खुर्द तालुका रावेत जिल्हा जळगाव आरोपी भूषण संतोष मिस्त्री वय वर्ष 29 राहणार निंभोरा जिल्हा बुरानपुर मध्य प्रदेश आरोपी मुकेश पिरमु ध्रुवे वय 29 राहणार चंदनगाव मध्य प्रदेश सध्या राहणार कारेगाव तास शिरूर जिल्हा पुणे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे सदर आरोपींना 26/12/2023 रोजी या गुन्ह्यांमध्ये अटक करून माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शिरूर कोर्टाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे
कंपनीमधील चोरी गेलेले संपूर्ण साहित्य हे आरोपी सुनील मांगीलाल महाजन वय वर्षे 48 सध्या राहणार अमरदीप सोसायटी कारेगाव यांना विक्री केलेले आहे यास आरोपावरून आरोपी महाजन यांना 28/12/2023 रोजी अटक झालेली आहे चिप्स बनविण्याचे लागणाऱ्या मशीनचे साहित्य व गुन्ह्यात वापरलेली स्कूटी मोटरसायकल जप्त करण्यात आलेली आहे
या प्रकरणाची कामगिरी मा अंकित गोयल सो पोलीस अधीक्षक सो पोलीस अधीक्षक पुणे नितेश गट्टे अप्पर पोलीस अधीक्षक पुणे यशवंत गवारी उपविभागीय अधिकारी शिरूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवण सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरडे सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ विजय शिंदे पोलीस हवालदार विलास आंबेकर माणिक काळकुटे यांनी केले आहे या गुन्ह्याचा अधिकचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अनिल मोरडे रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हे करत आहेत
