कष्टाच्या संघर्षाला यश !हिवरखेड मदन जागृत मुंबई पोलीस दलात निवड
कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे हिवरखेड (ता. मेहकर जिल्हा बुलढाणा) येथील मदन जागृत याची मुंबई पोलीस दलात हवालदार पदावर निवड झाली आहे. या यशामुळे मदनच्या कुटुंबासह संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे.
मदनचे बालपण एक सामान्य शेतकरी कुटुंबात गेले. त्याच्या आई-वडिलांनी अनेक अडचणींना सामोरे जात आपल्या दोन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली.
कुटुंबाची परिस्थिती बेताची असताना वडील अल्पशा आजाराने लवकरच सोडून गेल्यामुळे आई ने मुलांना कोणतीही कमतरता भासू दिली नाही. मदन जागृत हे एमआयडीसी मध्ये काम करत खूप अभ्यास केला
मुंबई पोलीस दलात निवड झाल्याने मदनच्या आई-आणि भाऊ यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. गावकरी आणि नातेवाईकांनी त्याच्या यशाचा जल्लोष साजरा केला. .
मदन जागृत यांचा प्रवास संघर्षातून यशाकडे जाणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी ठरेल. कठीण परिस्थितीवर मात करून जिद्द, मेहनत आणि ध्येयावर विश्वास ठेवल्यास कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते, हे त्याच्या कर्तृत्वाने सिद्ध केले आहे.

