मंचर दि.२८(संदिप डोके)
मंचर (ता.आंबेगाव) येथील पांडवकालीन बारव येथे भाजपा नेते जनसेवक श्री संजय भाऊ थोरात यांनी प्रयागराज येथून आणलेले जल विधीवत पूजा ह.भ.प संतोष महाराज बढे व मान्यवरांच्या हस्ते करून अर्पण करण्यात आले.
हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानल्या जाणाऱ्या आणि उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे सुरू असणाऱ्या महाकुंभ यात्रेत देशभरातून कोट्यावधी भाविक सहभागी होत आहेत.भाजपा नेते संजय थोरात यांच्या पुढाकाराने मंचर शहरासह तालुक्यातील तब्बल ३३२ भाविकांना कुंभ स्नानाचे भाग्य प्राप्त झाले असून; ज्यांना प्रयागराज येथे जाणे शक्य नाही त्यांनाही या पवित्र स्नानाचे भाग्य मिळावे यासाठी संजय थोरात यांनी पुढाकार घेतला आहे.
मंचर शहरासह तालुक्यातील अनेकांची महाकुंभ मध्ये सहभागी होऊन पवित्र स्नान करण्याची इच्छा
असूनही विविध कौटुंबिकजबाबदाऱ्या,आरोग्याच्या
समस्या,आर्थिक अडचणी, वेळेच्या मर्यादा आदी गोष्टींमुळे त्यांना प्रयागराज येथे जाणे शक्य नाही.अशा भाविकांसाठी भाजपा नेते संजय थोरात यांनी थेट त्रिवेणी संगमातील पवित्र जल सोबत आणले असून; हे जल ते आंबेगाव तालुक्यातील हुतात्मा बाबू गेनू जलाशय
अर्थात डिंभे धरण तसेच मंचर येथील पांडवकालीन बारव येथे विधीवत अर्पण करण्यात आले.
जिव्हाळा परिवाराच्यावतीने भाजपा नेते संजय थोरात यांच्या या कल्पक निर्णयाचे
कौतुक करण्यात आले,तब्बल १४४ वर्षांनी येणाऱ्या महाकुंभ मेळाव्यात प्रत्यक्ष सहभागी
होता न येणाऱ्या भाविकांना पांडवकालीन बारव येथे स्नान करून; तसेच डिंभे धरणाच्या प्रवाहातील घोड नदी पात्रात स्नान करून कुंभ स्नानाचे भाग्य प्राप्त करता येणार असल्याने आंबेगाव तालुक्यातील भाविकांच्या आनंदाला पारावर उरला नाही.
मला त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करण्याचे भाग्य लाभले याबद्दल मी स्वतःला अतिशय नशीबवान समजतो.यासोबतच तालुक्यातील ३३२ भाविकांना महाकुंभचे साक्षीदार होता आले; या गोष्टीचा तर मला विशेष अभिमान आहे.तब्बल १४४ वर्षांनी आलेल्या महाकुंभाचा प्रत्यक्ष साक्षीदार होत असताना,पवित्र स्नान करत असताना; मला माझ्या तालुक्यातील आणि मंचर शहरातील भाविकांना या स्नानाचे भाग्य मिळवून देण्याची कल्पना सुचली आणि
मी लगेचच या त्रिवेणी संगमातून पवित्र जल सोबत घेऊन आलो. हे पवित्र जल मंचर शहरातील पांडवकालीन बारव आणि
डिंभे धरणात अर्पण करून; मंचर शहर आणि तालुक्यातील जनतेला या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होताना मला पाहायचे आहे असे संजय भाऊ थोरात म्हणाले..
यावेळी ह.भ.प संतोष महाराज बढे,रवींद्र काका त्रिवेदी,राजेंद्र काका महाजन,किरण महाजन, कालिदास गांजाळे,विजय शिंदे,अतिश काजळे,संपत थोरात,भाऊ थोरात,रामदास थोरात,पिंटू थोरात,गणेश बांगर व जिव्हाळा परिवारातील सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंचरकरांना लाभणार कुंभ स्थानाचे भाग्य...
byLoknyay Sangharash
-
0

