रांजणगाव औद्योगिक वसाहती मधील रोडवरील बेकायदेशीर पार्किंग विरोधात काशिनाथ पाचंगे आक्रमक




प्रतिनिधी - अर्जुन शेळके


भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री काशिनाथ चंदरराव पाचंगे तसेच सौ.प्रियंका कांतीलाल जगताप महिला अध्यक्ष शिरूर तालुका यांनी ग्रामपंचायत ढोक सांगवी यांना अर्ज सादर करून या अर्जाचे सविस्तर वाचन करण्यात आले त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली तरी उपस्थित ग्रामस्थांनी आपले मत मांडत असताना गावच्या प्रमुख रस्त्यांमध्ये वारंवार अपघाताचे प्रमाण घडत असून यामध्ये बेकायदेशीर पार्किंग केलेल्या गाड्या अडथळा ठरत असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ती अपघात घडत आहेत तरी हे अपघात टाळण्यासाठी रांजणगाव एमआयडीसी मधील मुख्य अभियंते तसेच रांजणगाव पोलीस स्टेशन यांना एकमताने ग्रामपंचायत ढोक सांगवी यांचा ठराव देऊन यावरती कार्यवाही करण्यासाठी विनंती करण्यात आली आहे असे सांगण्यात आले

Post a Comment

Previous Post Next Post