उत्तर पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक्स मीडिया अध्यक्षपदी श्री अविनाश पवार तर उपाध्यक्षपदी श्री अमोल दरेकर यांचे निवड

 उत्तर पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक्स मीडिया अध्यक्षपदी श्री अविनाश पवार तर उपाध्यक्षपदी श्री अमोल दरेकर यांचे निवड




प्रतिनिधी-- अर्जुन शेळके


उत्तर पुणे जिल्हा नॅशनल इलेक्ट्रॉनिक मिडिया संघाची आज पहिली कार्यकारिणी जाहीर करण्यात आली . सध्या इलेक्ट्रॉनिक मिडिया मध्ये काम करणाऱ्या मुख्य प्रवाहातील आठ प्रतिनिधींचा समावेश या संघात करण्यात आला आहे.खेड,आंबेगाव,जुन्नर, शिरूर या चारही तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती पाहता या प्रतिनिधींना अनेक समस्यांना तोंड देत काम करावे लागते.त्यामुळे येत्या काळात एकत्र येऊन आपल्या समस्यांवर तोडगा काढणे तसेच कामाची गुणवत्ता





 वाढविणे या हेतूने ह्या संघाची पुढील वाटचाल असेल या संघांच्या प्रथम कार्यकारिणीचे अध्यक्ष NDTV चे प्रतिनिधी अविनाश पवार उपाध्यक्ष जय महाराष्ट्र चे प्रतिनिधी अमोल दरेकर यांच्यासह टीव्ही 9 मराठी चे प्रतिनिधी सुनील थिगळे, साम मराठी चे प्रतिनिधी रोहिदास गाडगे, Ibn लोकमत चे प्रतिनिधी सचिन तोडकर,zee 24 तास चे प्रतिनिधी हेमंत चापुडे, लोकशाहीचे प्रतिनिधी साईदिप ढोबळे या कार्यकारिणी मध्ये काम पाहणार आहेत

Post a Comment

Previous Post Next Post