निरोपाच्या प्रसंगी गहिवरले गुरु शिष्यांचे नाते




प्रतिनिधी ---अर्जुन शेळके 


राज्यस्तरीय उपक्रमशील शाळा पिंपरी दुमाला ता. शिरूर येथील शालेय विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये गुरु व शिष्यांच्या नात्यांमध्ये असलेला भावनिक ओलावा उपस्थित मान्यवरांनी अनुभवला. याप्रसंगी झालेल्या मनोगतामध्ये वर्ग शिक्षक कांताराम शिंदे यांनी आपल्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये असलेले गुण खुबीने प्रकट केले. विद्यार्थ्यांविषयी मनोगत व्यक्त करताना गुरुजींचा कंठ दाटून येत होता. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केलेल्या भावना उपस्थित माता पालकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू निर्माण करून गेले. 

कोरोना काळामध्ये इयत्ता पहिली मध्ये दाखल झालेले हे विद्यार्थी आपल्या गुरुजनांच्या प्रयत्नातून सर्व गुणसंपन्न झालेले पाहायला मिळाले.याप्रसंगी शिक्षक व विद्यार्थी यांनी एकमेकांसाठी भेटवस्तू दिल्या. या शाळेमध्ये मिळालेले संस्कार व शिस्त यांचे सदैव पालन करण्याची शपथ देऊन सर्व विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी व जीवनातील उत्तुंग ध्येय गाठण्यासाठी मुख्याध्यापक राहुल चातुर यांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post