रायचंद गव्हाणे यांची खंडाळे विविध कार्यकारी सोसायटीच्या उपाध्यक्षपदी निवड – निमगाव म्हाळुंगी सोसायटीतर्फे सन्मान
निमगाव म्हाळुंगी प्रतिनिधी संजय चव्हाण
(ता. शिरूर): निमगाव म्हाळुंगी गावचे सुपुत्र, माजी ग्रामपंचायत सदस्य आणि म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव श्री. रायचंद सहादू गव्हाणे यांची खंडाळे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या उपाध्यक्ष (व्हाईस चेअरमन) पदी नुकतीच एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या या यशस्वी निवडीबद्दल निमगाव म्हाळुंगी विविध कार्यकारी सोसायटीतर्फे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
गावाच्या सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील कार्यामुळे गव्हाणे यांची नेहमीच एक सकारात्मक आणि सक्रिय नेता म्हणून ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या निवडीतून त्यांच्यावर असलेला विश्वास आणि कार्यक्षमता अधोरेखित होते.या सन्मानप्रसंगी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी रायचंद गव्हाणे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आणि उपस्थित राहून सन्मान सोहळ्याची शोभा वाढविल्याबद्दल निमगाव म्हाळुंगी विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद व्यक्त करण्यात आले.
