गारपिटीमुळे नुकसान झालेल्या टरबुज उत्पादक शेतकऱ्यांना भरिव मदत द्या!प्रशात डिक्कर




संग्रामपूर/ सतत दोन दिवस गारपिटीमुळे झालेल्या टरबुज उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानीची शासनाने भरिव मदत द्यावी अशी मागणी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी केली आहे. तालुक्यातील वानखेड शिवारात सुरेश बन्शिलाल चांडक यांचे शेतामधे तुळशिराम सोनाजी कुरवाडे यांनी ७ एकर शेतावर टरबुज लागवड केली होती. कुरवाडे यांनी परिवारासह शेतात रात्र दिवस मेहनत घेऊन बाग फुलवली पंरतु अचानक टरबुज तोडनीपुर्वी प्रचंड प्रमाणात गारपिट झाल्यामुळे सर्व ७ एकर टरबुज बाग उध्वस्त झाली. त्यातील एक फळ सुध्दा खायला शिल्लक उरले नाही. तुकाराम कुरवाळे यांच्या प्रियंका नावाच्या मुलीचा याच टरबुज पिकांचे पैशावर २९ मे ला विवाह होणार होता. तर दुसरी मुलगी अंबिका हि १२ वी सायन्स ला शिकत आहे. पंरतु दोन तास चाललेल्या गारपिटीमुळे होत्याच नव्हत झाले. आणि घेतलेली मेहनत वाया गेली. मुलीच्या लग्नासाठी आणि अंबिकाचे शिक्षण व माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न करीत शेतकरी तुकाराम कुरवाडे ढसा ढसा रडले. यावेळी स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी १० एप्रिल रोजी शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. शेती मालक सुरेश चांडक व शेतीकसणार तुकाराम कुरवाडे यांना शासनाकडे पाठपुरावा करून नुकसान भरपाई मिळवुन देणार असल्याचा विश्वास यावेळी प्रशांत डिक्कर यांनी शेतकऱ्यांशी बोलतांना दिला. जगाला अन्न धान्य पुरवाणारा राज्यातील कष्टकरी राम नैसर्गिक संकटात आहे. दररोज आत्महत्या करीत आहेत. अशी नाजुक परिस्थिती असतांना देखिल राज्याचे मंत्रिमंडळ अयोध्येला गेले आहे. यांना शेतकऱ्यांचे काहिच देणेघेणे नाही केवळ अयोध्येला जाऊन धार्मिक मुद्दा उपस्थित करुण वातावरण निर्माण करणे आणि मतांची बेरीज जुळवा जुळव करण्यासाठी हा खटाटोप चालु असल्याचा गंभिर आरोप प्रशांत डिक्कर यांनी केला आहे. सरकारने वेळकाढूपणा न करता गारपिटीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा सरकारला राज्यातील शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी बोलतांना दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post