रिसोड येथे शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न



 रिसोड:येथून जवळच असलेल्या जि. प.शाळा निजामपूर येथे सत्र २०२३-२४ मध्ये इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी सरपंचा सौ.उषा किसन जाधव,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लखन खानझोडे,उपाध्यक्ष गजानन गायकवाड,गट्साधन केंद्र विषयतज्ञ सुनिता कावरखे,गावातील बहुसंख्य महिला आपल्या प्रवेशपात्र विद्यार्थ्यांसह उपस्थित होत्या.याप्रसंगी गावातून सकाळी प्रभातफेरी काढण्यात आली.शाळेचा परिसर पताका,फुगे रांगोळी काढून साजविण्याताला होता .दर्शनी भागात शाळतपूर्व तयारी संदर्भात फलक लावण्यात आले होते.शाळेला दोन महिने सुटी असल्याने इयत्ता पहिलीसाठी आवश्यक शारीरिक,बौद्धिक,सामाजिक व भावनिक तसेच गणितीय तयारी होण्याच्या दृष्टीने भारत सरकार,महाराष्ट्र शासन एनसीईआर्टी पुणे व डायट शिक्षण संस्था वाशिमच्या वतीने सदर अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थ्याच्या क्षमता विकासनाच्या दृष्टीने त्यांच्या हसत खेळत चाचण्या घेण्यात आल्या .याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन वरघट,शिक्षिका मंजुषा काळे,प्रज्ञा उपाध्ये,पुष्पा संबळे,धीरज जाधव,अंगणवाडी सेविका पवार,गीता हनवते,मदतनीस आदींनी मेळावा पार पाडण्यासाठी मोलाचे योगदान दिले.संचलन प्रज्ञा उपाध्ये यांनी तर आभार प्रदर्शन धीरज जाधव यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post