रिसोड प्रतिनिधी शेख
रिसोड : रिसोड तालुक्यातील लोणी येथे उंट किसान नावाच्या बनावट विडी विकणाऱ्याला मूळ कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. हे प्रकरण 26 एप्रिल दुपारचे आहे, यामध्ये शेख हबीब रा. परभणी याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरोधात कलम 420 कॉपीराइट ट्रेडमार्क नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, शेख हबीब हा बनावट बिडी तयार करून त्याची विक्री करत असल्याची माहिती मिळताच मुळ कंपनीतील कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला लोणी येथून पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याचेकडून २६ हजार ७०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.