प्रशांत डिक्कर यांनी सरकारचे श्राद्ध घातलेल्या आंदोलनाचा दणका..हरभरा खरेदीसाठी सरकारची नाफेडला परवानगी..जिल्ह्याला१ लाख ४७ हजार क्विंटलचे अतिरिक्त उद्दिष्ट.





संग्रामपूर/हरभरा खरेदीचे उद्दिष्ट पुर्ण झाल्यामुळे गेल्या २० दिवसांपासून जिल्ह्यातील संपूर्ण हरभरा खरेदी केंद्रे बंद करण्यात आले होते. जिल्ह्यातील एकूण ९४ हजार ४०५ शेतकऱ्यांनी हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी केवळ फक्त ३४ हजार २५७ शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यात आला पंरतु ६० हजार १४८ शेतकऱ्यांचा हरभरा घरामध्ये पडुन होता. याच संधिचा फायदा घेत व्यापारी शेतकऱ्यांचा कवडी मोल भावात हरभरा खरेदी करण्यासाठी चांगलेच सरसावले होते. जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचा कहर पाहुन स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी राज्याचे सहकार व पणन अपर मुख्य सचिव अनुप कुमार यांचेकडे हरभरा खरेदी केंद्रे सुरू करण्याबाबत निवेदनातून मागणी करण्यात आली होती. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दुर्लक्ष करत असल्याने स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर २२ एप्रिल रोजी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संग्रामपूर तहसील कार्यालयाचे प्रवेश द्वारा समोरच अक्षय तृतीयेचा घट मांडत शिंदे फडणवीस सरकारचे श्राद्ध घातले. या दोघांच्याही फोटो फ्रेमला फूलांचा असली हार टाकुन सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनाने राज्यातील सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांनप्रती नरमाईची भुमिका घेत ईतर जिल्ह्याच्या तुलनेत बुलढाणा जिल्ह्यासाठी १ लाख ४७ हजार २९६ क्विंटलचे अतिरिक्त उद्दिष्ट वाढवून दिल्याने हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. लवकरच प्रशांत डिक्कर यांच्या प्रयत्नाने हरभरा खरेदी केंद्रे सुरू करण्याच्या हालचालींना जिल्ह्यात वेग आला आहे. सरकारने शेवटच्या दाण्यापर्यंत शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करावा अशी मागणी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी सरकारकडे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post