पहील्या वाटपात १४७ शेतकऱ्यांना तर दुसऱ्या टप्प्यात १३७ शेतकऱ्यांना एकून पावने तीन कोटी रुपयाचे पीककर्जवाटप .
अकोला जील्हा मध्यवर्ती सहकारी बॅक शाखा काजळेश्वरचा पुढाकार .
कारंजा प्रतीनिधी .
दि अकोला जीला मध्यवर्ती सहकारी बँक शाखा काजळेश्वरचे शाखाधीकारी संजय म्हस्के यांनी सोसायटी अध्यक्ष सुभाष उपाध्ये ;उपाध्यक्ष मुजक्कीर भाई ;सचिव फिरोज निमसुखाडे यांचे पुढाकारात सरपंच नितीन पा .उपाध्ये व सोसायटी सदस्यांचे मार्गदर्शनात एप्रील महीन्यात लाभार्थी शेतक -यांना खरीप पीक कर्जवाटप१५एप्रील ला१४७शेतक -यांना तर २५ एप्रील ला१३७ शेतकऱ्यांना दुसरा टप्प्यात एकून जवळपास पावने तीन कोटी रुपयाचे पीक कर्जवाटप करण्यात आले . शेतकऱ्यांना जमीन मशागत ;बी बियाणे ;खत तसेच पेरणीपुर्व कामासाठी पीक कर्ज मिळाल्याने लाभार्थी शेतक्यांनी आनंद व्यक्त केला .नियमीत कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पांचटक्के वाढीव निधी मिळाला तो दहा टक्के तरी मिळायला पाहिजे होता असे मत काही शेतकरी सभासदांनी व्यक्त केले .पीक कर्जवाटपासाठी सचिव फिरोज भाई ;शाखाधीकारी संजय म्हस्के ;बॅक कर्मचारी उमेश निंबेकर ;अक्षय पाटील ;सोसायटी अध्यक्ष सुभाष उपाध्ये; उपाध्यक्ष मुजक्कीर भाई ;गजाननराव भड यांचे सह सदस्य गण व सहसुरक्षा कर्मचारी रामदास बावने यांनी जीकरी ने कर्जवाटप काम केले .त्या बाबात सरपंच नितीन पा उपाध्ये यांनी समाधान व्यक्त केले .
