मालेगाव प्रतिनिधी -उमेश लहाने
जिजामाता उच्च माध्यमिक विद्यालय पांगरी नवघरे चा इयत्ता 12 वी कला शाखा व विज्ञान शाखा या दोन्हींचाची उच्च माध्यमिक प्रमानपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च 2023 12 वी कला व विज्ञान शाखा निकाल जाहीर झाला असून तो 100 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेमधून श्रीराज गिरीश लाहोटी 92 टक्के गुण घेऊन प्रथम तर नेहा संजय ओझा 91.33 टक्के गुण घेऊन द्वितीय तर मुस्कान रवी भुतडा 91.33 टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे. यामध्ये एकूण 88 विद्यार्थी परीक्षेला बसले होते प्राविण्य श्रेणीत 62 विद्यार्थी आहेत. प्रथम श्रेणीत 25 तर द्वितीय श्रेणीत 1 विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे. तर कला शाखेत एकूण 63 विद्यार्थी परीक्षेला बसले होते यामध्ये प्राविण्य श्रेणीत 15 विद्यार्थी प्रथम श्रेणीत 39 विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत 09 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये अंजली एकनाथ खडसे 84.17 टक्के गुण घेऊन प्रथम तर अमोल माधव लबडे 83.17 टक्के गुण घेऊन द्वितीय तर कविता अरुण सरकटे 76 .33 टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे दोन्ही विभागाचा निकाल 100 टक्के लागल्यामुळे विद्यालयाचे संस्थाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराव जाधव,सचिव रंगनाथ पांडे,संचालक सुनील जाधव,राम जाधव अंजिक्य जाधव , प्राचार्य राधेश्याम घुगे,कला विभागाचे प्रा.गोकुळ राठोड, प्रा.संतोष वाझुळकर,प्रा.पंकज इश्वरे, विज्ञान विभागाचे प्रा.योगेश कावरे,प्रा.राजेश सांगळे,प्रा.प्रकाश गुडदे,प्रा.बाळू राऊत लिपिक अनंत जहागीरदार प्रयोगशाळा परिचर मोहन शिरसाट,नितेश हजारे व विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी कौतुक व अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.