एमआयडीसी येथील मोबाईल चोरी करणारा चोरटा जेरबंद ८५,०००/- रु किमतीचे चार मोबाईल जप्त

 


अहमदनगर अफसर शेख


एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी


दिनांक २८/०५/२०२३ रोजी १० ११ वा चे सुमारास फिर्यादी नामे अभिषेक सतिष झुगे, वय १७ वर्षे रा. पढेगाव ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर ह. रा. शिवाजीनगर, नवनागापुर ता. जि. अहमदनगर यांनी फिर्याद दिली की दि. २७/०५/२०२३ रोजी रात्री फिर्यादी व त्यांचे मित्र हे त्यांचे घराचे टेरेसवर झोपलेले असतांना उशाशी ठेवलेले ६५,०००/- रु किमतीचे दोन मोबाईल रात्री ०१.०० वा ते ०४.०० वा चे सुमारास अज्ञात चोरटयाने चोरुन नेले आहे. त्याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुरनं. ४७२/ २०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचा तपास करत असतांना सपोनि राजेंद्र सानप यांना गोपनीय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा आरोपी नामे बाळु शंकर काळे, वय १८ वर्षे २ महिने रा. चेतना कॉलनी, खंडोबा मंदिराचे पाठीमागे,


ता. जि. अहमदनगर याने केला आहे अशी माहिती मिळाल्याने सदर आरोपींना पकडणेकरीता एमआयडीसी पोलीस


स्टेशनचे पथक तयार करण्यात आले. सदर आरोपी यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे विचारपुस करता त्यांनी


सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. आरोपी नामे बाळु शंकर काळे, वय १८ वर्षे २ महिने रा. चेतना कॉलनी,




८५,०००/- रु किमतीचे चार मोबाईल जप्त करण्यात आलेले आहे.


सदरची कामगिरी श्री. राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे सो. अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री. संपतराव भोसले सो. उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. राजेंद्र सानप सो. प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोस्टे, पोसई राजेंद्र गायकवाड, पोसई चांगदेव हंडाळ, पांना मच्छिंद्र पांढरकर, पोना चांगदेव आंधळे, पोना संदिप आव्हाड, पोकी सचिन हरदास यांचे पथकाने केलेली आहे

Post a Comment

Previous Post Next Post