गोवा येथे पार पडलेल्या 18 व्या आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अर्जुननगर (गिरीम ) वेदांत शिंदे चा दुसरा क्रमांक




दौंड प्रतिनिधी:- आलिम सय्यद

         

गोवा येथे Ideal Play Abacus India Pvt Ltd तर्फे आयोजित नुकत्याच पार पडलेल्या गोवा येथील 18 व्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील अबॅकस स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील अर्जुननगर गिरीम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील  विद्यार्थी वेदांत दत्तात्रय शिंदे याने दुसरे पारितोषिक पटकावले आहे. या स्पर्धेसाठी भारतातील  विविध राज्यांमधून  सात हजार पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. वेदांतला लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षेची आवड असल्याने व त्याच्या पालकांचे व शिक्षकांचे त्याला योग्य



 मार्गदर्शन असल्याने त्याने अनेक स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे. त्याला या स्पर्धेसाठी अबॅकसच्या शिक्षिका संध्या दिपक फुले व  दिपाली प्रमोद वसगडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच जिल्हा परिषद शाळा अर्जुन नगरच्या त्याच्या वर्गशिक्षिका. रुपाली दत्तात्रय शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. वेदांतच्या या सुप्त गुणांना ओळखून त्याच्या वर्गशिक्षिका  शिंदे यांनी त्यास  मार्गदर्शन केल्यामुळे त्याला हे यश मिळाले आहे. तसेच त्याची मोठी बहीण सायली दत्तात्रय शिंदे ही नवोदय विद्यालय, पुणे येथे शिक्षण घेत असून तिने या स्पर्धेत चॅम्पियन ऑफ चॅम्पियनशिप मिळवून दैदीप्यमान यश संपादन केले आहे .शाळेतील शिक्षक व दौंड तालुक्यातील शिक्षणप्रेमी नागरिकांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post