लाल परीचे अच्छे दिन, रोज 2 लाख 80 हजारांची कमाईअकोला विभागात उत्पन्नात रिसोड आगार क्रमांक एक




प्रतिनिधी-शेख अन्सार 


रिसोड : महाराष्ट्र सरकारने महिलांना बस प्रवासात ५० टक्के सवलत दिल्यानंतर ओसाड पडलेल्या महामंडळाच्या बसेस ला  अच्छे दिन आले.राज्य महामंडळ रिसोड आगार उत्पन्नाच्या बाबतीत अकोला विभागात पहिल्या क्रमांकावर आहे.


 17 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्र सरकारने महिलांना 50% सवलत जाहीर केली, याआधी 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना मोफत प्रवास करण्याची घोषणा केली असली तरी, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.  महिलांना सूट दिल्यानंतर महामंडळाच्या बसेसच्या उत्पादनात अचानक वाढ झाली.




 बसमध्ये महिलांना ५० टक्के सवलत दिल्याने आतापर्यंत १ महिन्यात १ लाख ५९ हजार २४५ महिला प्रवाशांनी प्रवास केला असून यातून ६२ लाख २० हजारांचे उत्पन्न मिळाले आहे.  तर महामंडल ला सरकारकडून एवढाच निधी मिळणार आहे.  त्यातून रिसोड आगाराला दररोज सुमारे 2 लाख 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत प्रवासाबाबत बोलायचे तर एप्रिल ते 16 मे पर्यंत 1 लाख 98 हजार 600 प्रवाशांनी प्रवास केला आहे. शासनस्तरावरून महामंडळाला 1 कोटी 92 लाख 4 हजार 700 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.




 राज्य महामंडळाच्या रिसोड बस डेपोला अजूनही वाहनांची कमतरता भासत आहे.  महामंडळ रिसोड आगाराला 50 वाहनांची आवश्यकता आहे.रिसोड आगारात 41 वाहने मार्गावर धावत आहेत.  मात्र यातील काही बसेसची अवस्था एवढी बिकट झाली आहे की त्या कधीही बंद पडू शकतात त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.शासनाने याकडे लक्ष देऊन नवीन 10 वाहनांचा पुरवठा करावा.  त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात आणखी वाढ होइल .




 ज्येष्ठ नागरिकांनंतर महिलांना दिल्या जाणाऱ्या ५०% सवलतीचा खूप फायदा होत आहे.  शासनाच्या या पावलाने महामंडळाला जणू नवसंजीवनीच मिळाली आहे.  उत्पादन आणखी चांगले वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे.



 दादाराव दराडे


 आगार व्यवस्थापक, रिसोड

Post a Comment

Previous Post Next Post