रिसोड प्रतिनिधी -शेख अन्सार
रिसोड : रिसोड शहर व तालुक्यात वीज चोरीच्या वाढत्या घटना पाहता अभियंता आतिश जाधव व त्यांचे सहकारी रवींद्र बोडखे तंत्रज्ञ व पांडुरंग काळबांडे यांनी शहरा व तालुक्यातील विविध भागात वीजचोरांविरोधात मोहीम राबवून वीजचोरी करताना 9 जण आढळून आले. त्यामध्ये विलास नथुजी पवार रा.व्याड, लीलाबाई सीताराम धोत्रे, मदन पुंजाजी खोरणे, सुरेश वामन खोरणे, बजरंग पांडुरंग लाड सर्व रा. चिखली ता.रिसोड, शेख अलाउद्दीन अमरदास नगर रिसोड, राहुल जनार्दन वाळके ब्राह्मण गली रिसोड, वैजनाथ लक्ष्मण चव्हाण, . अबरार खान अजमत खान अमरदास नगर रिसोड हे लोक वीज चोरी करताना आढळून आले. या सर्वांवर विद्युत कायदा 2009 चे कलम 135 अन्वये कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अभियंत्याने दिली आहे.
Tags
महावितरण
