मालेगाव / सुरज अवचार
मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात एसटी बसच्या फेर्या कमी झाल्या आहे अनेक ठिकाणचे बसेस बंद झाल्या आहे व त्यामुळे एसटी महामंडळाने ग्रामीण भागातील बस फेर्या वाढवाव्या तसेच बस गाड्या पूर्ववत सुरू कराव्या अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांतर्फे केल्या जात आहे .
शासनाने ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसेस मध्ये प्रवास भाड्यात चांगली सवलत दिली आहे ६५ वर्षावरील व्यक्तींना पन्नास टक्के प्रवासात सवलत असुन ७५ वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवासाची सवलत आहे त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तींना ही एसटी बसच्या प्रवासात मोठ्या प्रमाणात सवलत आहे या सवलती बरोबरच आता महिलांना एसटी बस मध्ये प्रवासासाठी ५० टक्के सवलत जाहीर केली आहे शासनाच्या या निर्णयाचे महिला वर्गासह सर्वत्र उत्स्फूर्त स्वागत केल्या जात आहे परंतु दिलेल्या या सवलीचा फायदा ग्रामीण भागातील नागरिकापर्यंत पोहोचला पाहिजे व हा फायदा त्यांना मिळाला पाहिजे तो त्यांना मिळत नाही याला कारण ग्रामीण भागातील बस फेर्या या मोठ्या प्रमाणात बंद आहे मालेगाव तालुक्यात ग्रामीण भागात पुर्वी जाणाऱ्या एसटी बसेस प्रवासी अभावी बंद झाले आहे अनेक ठिकाणच्या बस फेर्या ह्या कमी करण्यात आले आहे व त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करुन खर्च करुन खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा आधार घ्यावा लागत आहे . काही ठिकाणी नवीन एसटी बस सुरू करण्यात यावी यासाठी एसटी बसच्या नवीन गाड्या उपलब्ध करण्यात याव्या अशी मागणी ही आता ग्रामीण भागातील नागरिकांतर्फे केल्या जात आहे .
