रिसोड शहरात अवैध गुटख्यावर धाड,सहा लाखाचा गुटखा सह तीन लाख रुपयाचे वाहन जप्त वाशिम च्या डीवायएसपी ची कारवाई





रिसोड : रिसोड शहर तालुक्यात अवैध गुटखा विक्रीच्या वाढत्या तक्राची लक्षात घेता गोपनीय माहितीच्या आधारावर वाशिमचे डीवायसपी अमर मोहिते यांनी आज दिनांक एक मे रोजी दुपारी दोनच्या दरम्यान आपल्या कर्मचाऱ्यांसह रिसोड शहरातील जुनी सराफा लाईन भागातील एका घरावर छापा टाकून प्रतिबंधित असलेला गुटखा जप्त केला. जप्त केलेल्या गुटख्याची किंमत सहा लाख रुपये असून त्यासोबत एक वाहन जप्त करण्यात आले संपूर्ण मालाची किंमत अंदाजे आठ लाख रुपये असून एवढ्या मोठ्या कारवाईनंतर गुटखा माफीयांचे धाबे दणाणलेले आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिसोड शहर व तालुक्यात होत असलेली अवैध गुटखा विक्री या विषयावर मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढ होत होत्या याच आधारावर डीवायएसपी अमर मोहिते यांनी सदर कारवाई केली. या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती तर आरोपीं बाबत कोणत्या प्रकारची माहिती मिळू शकली नाही

Post a Comment

Previous Post Next Post