वाशिम: जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद खरेदीच्या पहिल्याच दिवशी कमी दराने हळद खरेदी होत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी हळदीचा लिलाव बंद पाडत वाशिम-हिंगोली हायवेवर रास्तारोको आंदोलन सुरू केले होते. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दामुअण्णा इंगोले यांनी केलेल्या मध्यस्थी नंतर दर वाढवून देण्याची व्यापाऱ्यांनी भूमिका घेतल्याने खरेदी सुरू झाली. आवक वाढल्याचे पाहून व्यापाऱ्यांनी ५३००रुपयांपासून ते ५८०० पर्यंत हळद खरेदी करायाला सुरवात केली. मात्र आजच्या दिवशी इतर बाजार समित्यांमध्ये ६००० ते ७३३०० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याची सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळाल्या नंतर शेतकरी संतप्त झाले व त्यांनी लिलाव बंद पाडला. नंतर स्वाभिमानीचे दामुअण्णा इंगोले यांनी पुढाकार घेऊन शेतकरी, व्यापारी व बाजार समिती प्रशासना सोबत चर्चा करून किमान सहा हजार रुपये पेक्षा जास्त दराने हळदीची खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांना राजी केले व लिलाव सुरळीत सुरू झाला. ज्यामध्ये ६००० ते ६७०० रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना दर मिळाला. दामुअण्णा इंगोले यांच्या मध्यस्तीमुळे शेतकऱ्यांना हजार ते दीड हजार रुपये प्रतिक्विंटल वाढीव दर मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
