फुलचंद भगत
मंगरुळपीर :- दिनांक २० मे २०२३ रोजी श्रध्येय ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रभावित होऊन, आदरणीय रेखाताई ठाकूर यांच्या कार्यशैलीच्या प्रभावाने तथा प्रदेश महासचिव महिला आघाडी तथा वाशिम जिल्हा प्रभारी मा. अरुंधतीताई सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पश्चिम विदर्भ अध्यक्ष मा डॉ सिद्धार्थ देवळे,जिल्हा मार्गदर्शक तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम मा सुभाष राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज वाशिम जिल्ह्यात सुप्रसिद्ध, सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे माधवराव बल्लाळ सर रा. जयपूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश घेतला. यावेळी जिल्हा सचिव दिलीप भगत, वाशिम तालुका अध्यक्ष नारायण खोडके, ता महासचिव संजय पडघाण, गोवर्धन राऊत, तालुका नेते इस्माईल भाई नोरंगाबादी, अनसिंग येथील प्रसिद्ध युवा उद्योजक आकाशभाऊ काटेकर, युवा आघाडीचे यशभाऊ कंकाळ, नितीन बनसोड यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. प्रवेश घेतेवेळी माधवराव बल्लाळ यांनी उपस्थित सर्वांचे वाढदिवस साजरा केल्याबद्दल आभार मानले. माझ्यावर पक्ष जी जबाबदारी दिली जाईल ती 100% पूर्ण करण्यासाठी तन मन धनाने काम करून वंचित बहुजन आघाडी सर्व सामान्यांपर्यंत पाहोचविण्यासाठी प्रयत्न करेल. तसेच येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार आणि प्रसार होईल यासाठी संपूर्ण वाशिम जिल्ह्या पिंजून काढणार असे सत्कार स्वीकारताना सांगितले. माधवराव बल्लाळ यांच्या प्रवाशाने वंचित बहुजन आघाडीला नवीन उभारी मिळणार आहे. असे पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ सिद्धार्थ देवळे यांनी आपले मत व्यक्त केले. उपस्थित सर्वांनी माधवराव बल्लाळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन प्रवेश घेतल्याबाबत त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे संचालन तालुका महासचिव संजय पडघाण यांनी प्रास्ताविक केले तर आभार प्रदर्शन गोवर्धन राऊत यांनी केले.
