सैय्यद इमरान
मालेगांव। दुःखद बातमी
येथील ना .ना. मुंदडा विद्यालयाचे सेवा निवृत्त वरिष्ठ लिपीक दत्तराव कढणे यांचे १९ मे रोजी वयाच्या ६१ व्या वर्षी ह्रदयविकाराच्या तिव्र झटक्याने दुःखद निधन झाले .
अतिशय मनमिळाऊ , प्रामाणिक , सोज्वळ व सर्वांच्या सुख- दुःखात सहभागी होणारे दत्तराव कढणे यांनी मुंदडा विद्यालयात सुमारे ३६ वर्ष सेवा दिली . शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे देखील ते पदाधिकारी होते . त्यांच्या निधनाची बातमी समजताच शहरातील शेकडो स्नेहीजनांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन अंत्यदर्शन घेतले . आपल्या संपुर्ण आयुष्यात कोणालाही न दुखावणारे व आपल्या कर्तव्याप्रति एकनीष्ठ असलेले स्व . दत्तराव कढणे अल्पवयामधेच त्यांच्या स्नेही जणांना मात्र तिव्र वेदना देऊन गेल्याच्या प्रतिक्रिया यावेळी अनेकजण व्यक्त करत होते . त्यांना एक मुलगा एक मुलगी सुन व पत्नी तसेच मोठा आप्त परीवार आहे .
