तालुक्यातील पायाभूत सुविधा निर्मितीचा अनुशेष भरून काढा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे आ. मलिकांना निवेदन



मंगरूळपीर प्रतिनिधी-सरदार राठोड

मंगरूळपीर:- तालुक्यातील असंख्य गावे, वाडी, वस्त्या आणि तांड्यांमध्ये अद्यापही पायाभूत सोई सुविधांची निर्मिती न झाल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने मंगरूळनाथ-वाशिम मतदार संघाचे आमदार लखन मलिक यांना भारतीय जनता पक्ष भटके विमुक्त आघाडीच्या वतीने निवेदन देऊन ह्या समस्या शासन दरबारी मांडून सोडविण्याचा आग्रह केला आहे.

  अण्ण, वस्त्र निवाऱ्यासोबतच विद्यमान युगात जीवन जगण्यासाठी वीज, पाणी, दर्जेदार रस्ते, स्मशानभूमी इत्यादी प्रत्येक गावे, वाडी, वस्ती आणि तांड्यांमध्ये असणे गरजेचे आहे.

तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये अद्यापही स्मशानभूमीची निर्मिती न करण्यात आल्याने प्रचंड ऊन असताना व धो धो पाऊस पडत असताना पार्थिवाचे अंतिम कार्य करताना नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. स्मशान भूमी सोबतच विविध जाती समूहांना आपल्या कुटुंबातील आप्तेष्टांचे मंगल कार्य असो अथवा धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यासाठी सामाजिक सभागृहाची नितांत गरज असते. असले सामाजिक सभागृह बऱ्याच गावात नसल्याने या समाज बांधवांचीही मोठी अडचण होत असते.

तालुक्यातील नागरिकांच्या उपरोक्त समस्या निवारण्यासाठी भारतीय जनता पक्ष भटके विमुक्त वाशिम जिल्हा आघाडीच्या संघटक जयश्रीताई दुलसिंग राठोड, रामा कुऱ्हाडे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी नुकतीच आ. मलिक यांची भेट घेऊन पेडगाव येथील वडार समाज बांधवांसाठी सामाजिक सभागृह निर्माण करण्याचे निवेदन दिले.

भारतीय जनता पक्ष भटके विमुक्त जिल्हा आघाडीच्या निवेदनाचा अभ्यास करून आवश्यक त्या ठिकाणचा अनुशेष पाहून योग्य ती कारवाई करण्यात येण्याचे आश्वासन संबंधितांना दिल्याचे सौ.राठोड व कुऱ्हाडे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला माहिती दिली.

Post a Comment

Previous Post Next Post