कारंजा प्रतीनिधी / अशोकराव उपाध्ये
ब्रम्हा कुमारीज दिव्य समाज बनविण्याचे प्रशंसनीय कार्य करीत आहे . त्याच प्रमाणे शेतकरी दिव्य बनावा त्याला नैराश्येतून बाहेर काढावे शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या थांबाव्यात करीता शासनाने शेतकरी आर्थीक दृष्या सबलीकरण योजना राबवावी अशी मागणी शेतकरी जागर मंच द्वारा मनोज तायडे यांनी माऊंन्ट अबू येथे प्रंतप्रधान नरेंद्र मोदी आगमन प्रसंगी १० मे रोजी केली आहे .
शेतकरी जागर मंचकडून पुढे बोलतांना मनोज तायडे म्हणाले की निसर्गाची अवकृपा ;शेतमालाचे पडणारे भाव ;शेती उत्पादणासाठी वाढलेला खर्च यामुळे शेती व्यवसाय तोट्यात येत आहे . शेतकऱ्यांच्याकडे कुणाचेही लक्ष नाही निवडणूकीपुरते शेतकऱ्यांचे सरकार ;शेतकरी राजा म्हणून त्याची बोळवण केली जाते . प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांची स्थीती गंभीर आहे . तो खचला आहे .त्याला नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी ब्रम्हा कुमारीज शेतकरी समाज शक्तीशाली दिव्य बनविण्यासाठी त्यांची मानसिक स्थीती सुधारण्याचे काम करीत आहे तसेच काम केंद्र सरकार ;राज्य सरकार यांनी शेतकरी दिव्य बनावा त्याला आत्महत्तेसारखे टोकाचे पाऊल उचलन्याआधी शेतकरी आर्थिक सबलीकरण योजना आखून त्याला आत्मनिर्भर बनविण्याचे काम करावे अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आगमण प्रसंगी शेतकरी जागर मंचचे वतीने मनोज तायडे यांनी शासनाकडे केली आहे . याप्रसंगी राज योग अनुभूती शिबाराचे मार्गदर्शक हिरपूर अध्यात्मीक ब्रम्हा बाबा केंद्राचे प्रमूख प्रवीण ढगे यांची उपस्थीती होती .
