जिजाऊ ब्रिगेडची शिवाजीनगर रिसोड येथे संवाद बैठक

 


प्रतिनिधी -अन्सार शेख

रिसोड : सर्वात मोठे वैचारिक संघटन असलेल्या मराठा सेवा संघ प्रणित महिलांचे संघटन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने रिसोड येथील शिवाजीनगर येथे  संवाद बैठकीचे आयोजन शिवमती सुनीताताई बोरकर  यांच्या निवासस्थानी 14 मे  रोजी करण्यात आले होते. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जिजाऊ आणि शंभूराजे यांच्या प्रतिमेचे पूजन करून जिजाऊवंदना घेऊन बैठकीची सुरवात करण्यात आली.  या संवाद बैठकीच्या अध्यक्षस्थानी कदमताई  या होत्या तर  प्रमुख उपस्थितीमध्ये जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्षा किरण कव्हर, तालुकासचिव सुनीताताई बोरकर तथा मार्गदर्शक उषाताई हाडे  यांची उपस्थिती होती.


 यावेळी महिलांच्या वेगवेगळ्या समस्या तसेच महिलांमधील शिक्षण, महिलांचे आरोग्य, महिलांचे स्वावलंबन व सक्षमीकरण आदी विषयांवर चर्चा करण्यात येऊन मार्गदर्शन करण्यात आले. सोबतच जिजाऊ ब्रिगेड चे कार्य आणि जिजाऊ ब्रिगेड विस्ताराबाबत चर्चा करण्यात आली.  

या बैठकीसाठी इरकर ताई, दीपाली मोरे, नीता साखरे, खराटे ताई, भिसडेताई, केन वडकरताई, कदमताई, शिंदेताई, खराटेताई, शारदा मोरे, शुंभागी खरबळ, देशमुखताई, बोडखेताई आदी महिलांची उपस्थिती होती..

Post a Comment

Previous Post Next Post