शिरपूर येथे दिगंबर जैन तीर्थरक्षा संघर्ष समितीचे गठन

 


सैय्यद इमरान

मालेगाव   धार्मिक बातमी


मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील अंतरिक्ष पार्श्वनाथाची मूर्ती मूळ स्वरूपात प्रकट करण्याचा संकल्प घेत श्री दिगंबर जैन तीर्थरक्षा संघर्ष समितीचे गठण आचार्य विद्यासागरजी महाराज यांचे परमशिष्य निर्यापक श्रमणमुनीश्री योगसागरजी महाराज, ऐलक श्री सिध्दांतसागरजी महाराज यांच्या उपस्थितीत १५ मे रोजी निकलंक निकेतन शिरपूर येथे पार पडलेल्या बैठकीत करण्यात आले.


पार्श्वनाथच्या दुसऱ्या टप्प्यातील मूर्तीची लेप प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिगंबर समाजाच्या वतीने तीर्थरक्षा समितीचे गठन करण्यात आले आहे. मूर्तीच्या लेप प्रकियेच्या वेळी मंदिर व मंदिर परिसरात झालेल्या अपवित्रतेबाबत चर्चा करण्यात आली. भविष्यात मंदिराची पवित्रता कायम ठेवण्यासाठी मंदिरामध्ये चामड्याच्या वस्तू सोबत घेऊन प्रवेश करता येणार नाही, असा ठराव एकमताने घेण्यात आला.


मंदिर व परिसरातील पवित्रता कायम ठेवण्याकरीता प्रशासनाने सहकार्य करावे व दिगंबर समाजाच्या भावनेला ठेच पोहचणार नाही, याची काळजी घेण्यात यावी, असे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे. अंतरिक्ष पार्श्वनाथ मूर्तीची लेप प्रक्रिया व इतर विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. अशी माहिती सिद्धांत सागर महाराज यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

 समितीमध्ये केंद्रीय संयोजक ब्रह्मचारी सुरेश मलैय्या, त्र. तात्याभैया नेजकर, चंद्रशेखर उखळकर, अॅड. सुरेद्र बाकलीवाल, अॅड. धनंजय रोकडे, जितेंद्र छाबडा, आकाश महाजन, भुषण महाजन, संजय जैन हिंगणघाट, हरिष बज, रवि बज, आदिंची अविरोध निवड करण्यात आली. सोबतच विविध प्रकोष्ठाचे गठण करण्यात येऊन सल्लागार प्रकोष्ट संयोजक श्रेणीक भुरे, विधीप्रकोष्ठ अॅड. यावेळी करण्यात आला. धनंजय रोकडे, संगठन प्रकोष्ट आशिष डहाळे, प्रचार प्रकोष्ट प्रदीप सावळे, संपर्क प्रकोष्ट आनंद गडेकर, प्रकोष्ट कार्यालय प्रकोष्ठ अनिल वाल्ले  पुजनप्रकोष्ट मयुर विश्वंभर, शिक्षा संस्कार प्रकोष्ट स्वप्नील काळे, मुनीसेवा प्रकोष्ट जितेंद्र, मलैया यांनी केले.

भोजन प्रकोष्ठ सुनिल महाजन, वित्त प्रकोष्ट डॉ. अभय गुंगे, मंदीर सुरक्षा प्रकोष्ट तुषार कान्हेड, युवा रोजगार प्रकोष्ट धीरज बांडे आदिंची निवड करण्यात आली. यावेळी तीर्थक्षेत्रामध्ये भक्तांकरीता निशुल्क वाहन व्यवस्था व येणाऱ्या-जाणाऱ्या यात्रेकरूंना निवास व भोजनाची व्यवस्था समितीच्या वतीने करण्यात येणार असल्याचा संकल्प निर्यापक श्रमणमुनीश्री योगसागरजी महाराज व ऐलक सिध्दांतसागरजी महाराज यांनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या दिगंबर बांधवांना मार्गदर्शन केले. संचालन व आभार ब्रह्मचारी सुरेश मलीय यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post