Soybean Farming Maharashtra : राज्यात 15 जूनच्या दरम्यान मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी आवश्यक पूर्वतयारी सुरू केली आहे. आपल्याकडे खरीप हंगामात सोयाबीन या पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते.दरम्यान सोयाबीन उत्पादकांना कृषी तज्ञांनी एक मोलाचा सल्ला दिला आहे. कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सोयाबीन उत्पादकांनी सोयाबीनच्या प्रगत जातीची पेरणी केली पाहिजे. यासोबतच पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी एक महत्त्वाचं काम करणे अपेक्षित आहे.तज्ञांच्या मते शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्याची पेरणी करताना बियाणे उगवण क्षमता तपासली पाहिजे.कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी बियाण्याची उगवण क्षमता तपासणी गोणपाट किंवा वर्तमानपत्राच्या कागदात एका ओळीमध्ये १.५ ते २ सें.मी. अंतरावर १० दाणे ठेवावेत. अशा प्रकारे १० ओळींमध्ये एकूण १०० दाणे व्यवस्थित रांगेत ठेवले पाहिजे. त्यानंतर मग गोणपाटावर अथवा वर्तमानपत्रावर पाणी टाकून ते ओले करावे.
मग ते गोल गुंडाळून थंड ठिकाणी सावलीत ठेवावे लागणार आहे. शिवाय अधूनमधून त्यावर पाणी शिंपडत राहावे लागणार आहे. यानंतर सहा ते सात दिवसांनंतर कोंब आलेले दाणे वेगळे करून मोजने अपेक्षित आहे. यामध्ये जर अंकुरलेल्या बियाण्यांची संख्या 70 असेल तर बियाण्याची उगवनक्षमता 70 टक्के आहे असे समजावे. तसेच ज्या बियाण्यांची चांगली उगवण क्षमता असेल असेच बियाणे पेरणीसाठी वापरले पाहिजे.
अशा परिस्थितीत आज आपण कृषी तज्ञांनी सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासण्यासाठी सांगितलेली पद्धत आणि किती टक्के उगवण क्षमता असलेले सोयाबीन बियाणे पेरणीसाठी वापरले पाहिजे याबाबत सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोततसेच जर अंकुरलेले बियाणे 80 असतील तर बियाणे उगवनक्षमता 80 टक्के आहे असे समजावे. कृषी तज्ञांच्या मते 70 टक्के किंवा 80 टक्के उगवण क्षमता असलेले बियाणे पेरणीसाठी चांगली असते.
मात्र जर बियाण्याची उगवण क्षमता 60 टक्के पेक्षा कमी असेल तर असे बियाणे पेरू नये. यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती असते. एकंदरीत चांगले उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनी 70 ते 80% उगवण क्षमता असलेले सोयाबीन बियाणे या हंगामात पेरावे..महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादन
सोयाबीन हे प्रमुख तेलबिया पीक असून नगदी पिकाचा दर्जा याला प्राप्त आहे. या पिकाची महाराष्ट्र, मध्य प्रदेशसह देशातील काही अन्य राज्यात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. एका शासकीय आकडेवारीनुसार देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनात मध्य प्रदेश राज्याचा 45 टक्के वाटा आहे.
तसेच देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी आपल्या महाराष्ट्रात 40 टक्के सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. म्हणजेच सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत देशात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे.