आज बाजार समितीच्या सभापती, उपसभापती ची निवडणूक उगले किंवा पाचरणे या दोघांपैकी एक निश्चित

 


प्रतिनिधी -अन्सार शेख

रिसोड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती ची आज दिनांक 25 मे रोजी निवडणूक होणार आहे या निवडणुकीकडे तालुका नव्हे तर जिल्हावासिंचे लक्ष लागून आहे.वाशिम ची राजकीय राजधानी म्हणून रिसोड ची ओळख असून या ठिकाणी होणाऱ्या प्रत्येक घडामोडी कडे जिल्ह्या लक्ष लागून असतं. सभापती निवडणुकीत भाजपा चे अनंतराव देशमुख निर्णय घेणार हे मात्र नक्की. बाजार समितीमध्ये नुकत्याच झलेल्या निवडणुकीत भाजपचे दहा तर आठ सदस्य हे महाविकाचे निवडून आले आहे. गेली कित्येक वर्षापासून सभापती उपसभापतीची निवडणूक ही अविरोध होत होती तर मात्र यावेळी ही निवडणूक अविरोध होणार नाही हे मात्र नक्की. सभापती पदाच्या शर्यतीमध्ये शामराव उगले व गजानन पाचरणे यामध्ये रस्सीखेच दिसून येत आहे. या दोघांपैकी एक सभापती होणार असल्याचे बोलले जाते. या दोघांपैकीच एकाचे नाव माजी खासदार भाजपा नेते अनंतराव देशमुख यांनी निश्चित केले असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळते.उपसभापतीसाठी सुद्धा एक मोठी स्पर्धा दिसून येत आहे.पहिला उपसभापती कोण ? याबाबत माजी आमदार विजयराव जाधव व खासदार भावनाताई गवळी यांच्या संचालकातामध्ये चुरस दिसून येत आहे 25 रोजी हे सर्व चित्र स्पष्ट होणार हे मात्र नक्की. बाजार समितीच्या 10 संचालकामध्ये विजयराव जाधव यांचा एक तर भावनाताई गवळी यांचा एक सदस्य निवडून आलेला आहे. तर आठ सदस्य हे अनंतराव देशमुख यांच्या गटाचे आहे. त्यामुळे सभापती हा अनंतराव देशमुख गटाचा होणार हे मात्र नक्की. सदर सभापतीच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब खरात व सुधीर जाधव यांची महत्त्वपूर्ण भूमिका असणार असल्याचे बोलले जात आहे. सभापती चा उमेदवार ठरविण्यात सदर दोन्ही जण हे अनंतराव देशमुख यांचे अत्यंत निकटवर्तीय असल्याने त्यांचा सल्ला मोलाचा ठरणार असल्याचे कळते.


सदर निवडणुकीच्या बाबत सभापतीच्या उमेदवारावरून महाविसाकास आघाडीचे नेते आमदार अमित झनक यांना विचारले असता आमचज सर्व आठही संचालक हे सभापती पदाचे दावेदार असून त्यांच्यामध्ये सर्व गुण असल्याने उद्या सकाळी निवडणुकीच्या एक तास आधी उमेदवाराची घोषणा करणार असल्याचे झनक यांनी सांगितले

Post a Comment

Previous Post Next Post