अनेक ठिकाणी विद्यमान आमदारांना संधी, पहा व्हायरल यादीत कोण कुठून लढणार?
प्रतिनिधी-नितीन बोराडे
मुंबई दि २४ (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणूकीला अजून एक वर्ष शिल्लक आहे. पण महाविकास आघाडीत आत्तापासूनच जागा वाटपावरुन खडाजंगी होत आहे. तिन्ही पक्षांमध्ये अजून जागांचा आकडाही पक्का नसताना सोशल मिडीयावर एक यादी व्हायरल झाली आहे. यात जागा वाटपाबरोबरच उमेदवार देखील निश्चित झाले आहेत. याची जोरदार चर्चा होत आहे.
महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झाले असून ठाकरे गट लहान भाऊ ठरला असुन अनपेक्षितपणे काँग्रेसला सर्वाधिक जागा देण्यात आल्या आहेत. नवीन यादी नुसार लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसला सर्वाधिक १६, राष्ट्रवादी काँग्रेसला १५, ठाकरे गटाला 1३ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. तर राजू शेट्टीयांच्या स्वाभिमानी पक्षाला एक आणि वंचित बहुजन 'आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना २ जागा देण्यात आल्या आहेत. पण या यादीनुसार अनेक विद्यमान आमदारांना तिकिट देण्यात आले आहे जर ही यादी अंतिम राहिल्यास काही ठिकाणी सासरा विरूद्ध सुन तर काही ठिकाणी भाऊ विरूद्ध बहीण अशी लढत होण्याची शक्यता आहे.महाविकास आघाडीचे संभावित जागावाटप
नंदुरबार- के. सी. पाडवी (काँग्रेस)
धुळे- कुणाल पाटील (काँग्रेस)
जळगाव- गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)
रावेर- एकनाथ खडसे (राष्ट्रवादी)
बुलढाणा- नरेंद्र खेडेकर ( शिवसेना- ठाकरे गट)
अकोला - सुनील फाटकर ( वंचित बहुजन
आघाडी)
अमरावती- दिनेश बूब (शिवसेना- ठाकरे गट)
वर्धा - रणजीत कांबळे (काँग्रेस)
गडचिरोली- धर्मराव बाबा आत्राम (राष्ट्रवादी)
रामटेक - नितीन राऊत (काँग्रेस)
नागपूर- नाना पटोले (काँग्रेस)
गोंदिया- प्रफुल पटेल (राष्ट्रवादी)यवतमाळ- संजय देशमुख ( शिवसेना- ठाकरे गट)
हिंगोली - प्रज्ञा सातव (काँग्रेस) परभणी- संजय जाधव (शिवसेना- ठाकरे गट)
संभाजीनगर- अंबादास दानवे (शिवसेना-ठाकरे
गट)
धाराशिव ओमराजे निंबाळकर (शिवसेना-ठाकरे
गट)
जालना- कल्याण काळे (काँग्रेस)
नांदेड- अशोक चव्हाण (काँग्रेस)
लातूर- मच्छिंद्र कामत (काँग्रेस)
सोलापूर- प्रणिती शिंदे (काँग्रेस)
बीड- धनंजय मुंडे (राष्ट्रवादी)
कोल्हापूर- संजय पवार ( शिवसेना-ठाकरे गट)
दिंडोरी - नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी)
नाशिक- छगन भुजबळ (राष्ट्रवादी)
पालघर- बळीराम जाधव (बहुजन विकासआघाडी)
भिवंडी- सुरेश टावरे (काँग्रेस)
कल्याण- आनंद परांजपे (राष्ट्रवादी) ठाणे- राजन विचारे (शिवसेना- ठाकरे गट)
मुंबई उत्तर- संजय निरुपम (काँग्रेस)
मुंबई उत्तर पश्चिम- अमोल कीर्तिकर ( शिवसेना-
ठाकरे गट)
मुंबई उत्तर पूर्व- संजय दिना पाटील (शिवसेना-
ठाकरे गट)
मुंबई उत्तर मध्य- प्रिया दत्त (काँग्रेस)
मुंबई दक्षिण मध्य - प्रकाश आंबेडकर (वंचित
बहुजन आघाडी)
मुंबई दक्षिण- अरविंद सावंत (शिवसेना-ठाकरे
गट)
रायगड- सुनील तटकरे (राष्ट्रवादी)
बारामती- सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
शिरुर- अमोल कोल्हे (राष्ट्रवादी)
मावळ- पार्थ पवार (राष्ट्रवादी) पुणे- रविंद्र धंगेकर (काँग्रेस) अहमदनगर- निलेश लंके (राष्ट्रवादी) शिर्डी- बबनराव घोलप ( शिवसेना-ठाकरे गट) माढा - संजय शिंदे (राष्ट्रवादी) सांगली - विश्वजीत कदम (काँग्रेस) सातारा- रामराजे निंबाळकर (राष्ट्रवादी) हातकणंगले - राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी
रत्नागिरी- विनायक राऊत (शिवसेना-ठाकरे गट)
संघटना)
चंद्रपूर- बाळू धानोरकर (काँग्रेस)
