शिर्डी येथील राज्यस्तरीय अधिवेशनात रिपब्लिकन पक्षाची ताकद दाखवा नगर तालुका आढावा बैठकीत जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांचे आवाहन

 


अहमदनगर अफसर शेख



अहमदनगर-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्यावतीने 28 मे 2023 रोजी शिर्डी अहमदनगर येथे महाराष्ट्र राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड संख्येने सामील होऊन रिपब्लिकन पक्षाची ताकद दाखवावी असे आवाहन रिपाईचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी नगर तालुका रिपाई पक्ष आयोजित आढावा बैठकीत केले आहे. रिपब्लिकन पक्षाचे हे भव्य राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डी येथे शिर्डी राहता रोड कांदा मार्केट समोरील मैदानावर 28 मे 2023 रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले मार्गदर्शन करणार आहेत.तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अहमदनगर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. रिपब्लिकन पक्षासोबत बहुसंख्य प्रमाणात समाज आहे हे दाखवून देण्यासाठी प्रत्येक विभागातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी समर्थकांसह उपस्थित राहून रिपब्लिकन पक्षाची ताकद दाखवून द्यावी.असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे यांनी अध्यक्षीय भाषणात केले आहे.सर्वांचे आभार नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले यांनी केले.यावेळी अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे,उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, जिल्हा सरचिटणीस विजय भांबळ,ज्येष्ठ नेते विलास साठे,संजय कांबळे,शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे,नगरसेवक राहुल कांबळे,महिला जिल्हाध्यक्ष आरती बडेकर,महिला तालुका अध्यक्ष कविता नेटके,युवक जिल्हा अध्यक्ष विवेक भिंगारदिवे,नगर तालुका अध्यक्ष अविनाश भोसले, कृपाल भिंगारदिवे,किशोर कांबळे,संतोष गायकवाड, प्रतिक नरवडे,राहुल ठोंबे,अविनाश उमाप,संतोष कांबळे,दीपक पाडळे,जयराम आंग्रे,अजय रोकडे,प्रणव त्रिभुवन,भैया गायकवाड,संदेश क्षेत्रे,अक्षय शेलार,सोनू ठोंबे,गणेश आरोळे, संदेश पाटोळे,सुरज भिंगारदिवे,प्रथमेश ठोंबे,अविनाश ठोंबे,सिकंदर शेख,आयुब भाई शेख,कदम आदी उपस्थित होते.अशी माहिती जिल्हा प्रसिद्धी प्रमुख लोकेश बर्वे यांनी दिली

Post a Comment

Previous Post Next Post