श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीची पुजा शेतकरी कुटुंबाच्या हस्ते
आमदार अमितभाऊ झनक यांची पदग्रहण सोहळ्यात ग्वाही
रिसोड प्रतिनिधी- अन्सार शेख
रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा पदग्रहण सोहळा थाटा माटात संपन्न झाला.यावेळी रिसोड मालेगाव मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अमित भाऊ झनक यांच्या अध्यक्षतेखाली हा पदग्रहण सोहळा संपन्न झाला.यावेळी उपस्थित शिवसेना ठाकरे गटाचे विश्वनाथ सानप,माजी अभियंता बाळासाहेब देशमुख,वंचित बहुजन आघाडी चे डाॅ रविंद्र मोरे पाटील,भुमी पुत्र संघटनेचे अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर,राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष तेजराव
वानखेडे, पंचायत समिती चे सभापती बंडु भाऊ हाडे,माजी सभापती तुकारामजी मोरे,भागवत मोरे,संभाजी ब्रिगेड चे जिल्हा अध्यक्ष अर्जुन खरात,बबनराव गारडे, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष प्रकाशराव वायबसेनवनिर्वाचित संचालक बाबाराव सानप,धनंजय बोरकर,भिमराव शेजुळ,रवि चोपडे, भगवान गाडे,यांची उपस्थिती होती.पदग्रहण सोहळ्याला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदार अमित भाऊ झनक यांनी बोलताना सांगितले कि या वर्षी श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे आगमन दि ४ जुन रोजी रिसोड शहरात होणार आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये पालखी चा मुक्काम असतो.पालखीची पुजा या वर्षी शेतकरी राजा यांच्या हस्ते होणार आहे.असे आश्वासन आमदार यांनी या पदग्रहण सोहळ्यात बोलतानी सांगितले.पदग्रहण सोहळ्याला काॅग्रेस चे राजु राऊत,बाबाराव ढोणे, डॉक्टर रामेश्वर नरवाडेसचिन इप्पर,राजु खांबलकर,वंचित चे गिरिधर शेजुळ,प्रदिप खंडारे, पाटील खरात विश्वनाथ आरू गजानन माळीकर संजय सदार विजय सिरसाठ, विश्वनाथ पारडे,राष्ट्रवादी चे,शिवसेना ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते.

