फिनोलेक्स कंपनी तर्फे श्री संत गजानन महाराज यांच्या दिंडीतील वारकऱ्यासह 15000 पंधरा हजार भाविक भक्तांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले





रिसोड : फिनोलेक्स कंपनी तर्फे श्री संत गजानन महाराज यांच्या दिंडीतील वारकऱ्यासह 15000 पंधरा हजार भाविक भक्तांना कापडी पिशव्यांचे   वाटप करण्यात आले 

      दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचा मुक्काम येथील बाजार समितीमध्ये होता मुक्कामाच्या ठिकाणी भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले या वेळी श्री संत गजानन महाराजांच्या दिंडीतील वारकऱ्या सोबतच भावीक भक्तांना फिनोलेक्स कंपनी तर्फे 15000 पिशव्यांचे वाटप करण्यात आले. पिशव्या आकाराने मोठ्या असल्यामुळे जीवनावश्यक वस्तू व इतर साहित्य ठेवण्यासाठी त्यांचा उपयोग होत असल्यामुळे वारकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले  यावेळी फिनोलेक्स पाईप चे अधिकृत विक्रेता  वाशिम जिल्ह्याचे श्रावणी ट्रेडर्सचे संचालक मंगेश आप्पा साखरे  विक्री व विपणन विदर्भ प्रबंधक श्री चेतन चांडक अकोला वाशिम जिल्ह्याचे सेल्स इंजिनियर अक्षय गवळी गंगाराम सुरसे गजानन उगले खंडागळे विठ्ठल शेळके विनायक राऊत योगेश कोठाळे गणेश घोडके हे उपस्थित होते सर्व पदाधिकारी व व्यापारी वर्ग यांना अति परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

Post a Comment

Previous Post Next Post