रोटरी क्लब च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन




दौंड:- आलिम सय्यद, 


पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील रोटरी क्लब ऑफ कुरकुंभ एमआयडीसी च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदरचे शिबीर कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील रोटरी हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये १५३ जणांनी  रक्तदान केले. या कार्यक्रमाप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील ठोंबरे सचिव शशिकांत पाटील व सतीश मचे माजी अध्यक्ष फुलचंद ढोरे , विनोद शितोळे , मनीष अग्रवाल ,अमोद पानसे , डॉ.राजेश दाते राजेंद्र जगदाळे शहाजी पवार,  रोटरी डिस्ट्रिक्ट चे विकास टोपले , दिनेश भागवत , पांढरेवाडी, कुरकुंभ गावचे पोलीस पाटील ,सरपंच , उपसरपंच  तसेच दौंडचे युवा नेते तुषार रमेश थोरत यांनी या शिबिरा प्रसंगी भेट दिली या रक्तदान शिबिराच्या निमित्ताने प्रत्येक रक्तदात्यास रोटरी क्लबच्या वतीने एक टी-शर्ट व प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी कुरकुंभ एमआयडीसी मधील विविध कंपनीमधील कामगारांनी यावेळी रक्तदान केले  यावेळी रक्तदान करणाऱ्या कामगारांचे तसेच पांढरेवाडी, कुरकुंभ परिसरातील ग्रामस्थांनी रक्तदान केल्याने त्यांचे रोटरी क्लब ने आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post