अतिक्रमण हटवून शेतीचे पाण्याची वाट मोकळी करुन देण्याची मागणी



प्रतिनिधी अन्सार शेख

रिसोड : पुला जवळील अतिक्रमण हटवून शेतीचे पाण्याची वाट मोकळी करुन देण्याची मागणी तहसील कार्यालय कडे एका निवेदनाद्वारे शेख युसूफ शेख अब्दुल्ला शेख कदिर शेख अब्दुल्ला यानी केली आहे निवेदनात म्हटले आहे की,आमची शेती मोजे रिसोड ता. रिसोड जि. वाशीम येथील स.न. ३९० / १ मालकीची असून शेतीच्या समोरील असलेला मालेगाव रोडवरील सरकारी पुलावर काही लोकांनी अतिक्रमण करून पुलाचा नाला बंद करून तार फाऊंडेशन करण्यात आल्यामुळे आमच्या शेतीतील पावसाचे पाण्याची वाट कबंद झाल्याने शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. तसेच आमची आर्थिक परिस्थिती फार बिकट असल्यामुळे शेताला लागणारे बियाणे परत- परत खरेदी करू शकत नाही. त्यामुळे माझे होणारे आर्थिक नुकसान झाल्यास त्यास जबाबदार कोण राहील हा प्रश्न निर्माण होत आहे, सदर विषयावर आपण प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमण हटवून शेताची वाट आणि पुल मोकळा करून देण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर शेख युसुफ व शेख कदीर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

Post a Comment

Previous Post Next Post