22 जून नंतरच पेरणीयोग्य पाऊस,मान्सून दाखल,पण सक्रिय नाही : पंजाबराव डख.




प्रतिनिधी-अन्सार शेख रिसोड ता.14

मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला परंतु सार्वत्रिक पाऊस पडणार नाही 22  व 27 जून नंतरच पेरणीयोग्य पाऊस पडेल असे हवामान तज्ञ पंजाब डख यांनी सांगितले ते येथील बाजार समितीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

          पुढे बोलताना पंजाब डख म्हणाले महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असला तरी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पुढे सरकत नसल्यामुळे सध्या तरी सार्वत्रिक पावसाची शक्यता कमीच आहे 22 व त्यानंतर 27 जून रोजी पेरणीयोग्य पाऊस होईल जमिनीत पुरेशी होऊन गेल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला  मान्सूनला चक्रीवादळाचा अडथळा निर्माण झाल्यामुळे यावर्षी विदर्भामध्ये पूर्वेकडून पाऊस येईल त्यामुळे पूर्व विदर्भामध्ये खूप पाऊस होईल शेतकऱ्यांनी जमिनीमध्ये पुरेशी ओल असल्याशिवाय म्हणजेच एक वित ओल असेल तरच पेरणी करावी जून पेक्षा जुलै व ऑगस्टमध्ये जास्त पाऊस राहण्याचा अंदाज देखील त्यांनी वर्तविला आहे याबरोबरच निसर्गाकडून  पशु पक्षाकडून व वृक्षाकडून पावसाचे अंदाज त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले तसेच विजा का पडतात अवकाळी पाऊस का होतो याबद्दलही शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून झाडे लावण्याचे आवाहन केले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post