मोबाईलच्या ऑनलाईन कामामुळे अंगणवाडी कर्मचारी त्रस्त



मालेगाव -उमेश लहाने 

अंगणवाड्यांचे कामकाज ऑनलाइन करण्यात आले. मात्र हे काम करताना अंगणवाडी सेविकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

संगणक अज्ञानी असलेल्या बऱ्याचशा अंगणवाडी सेविकांना मग एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा आधार घ्यावा लागत आहे. त्यासाठी स्वतः जवळचे पैसे खर्च करावे लागतात. केवळ सात हजार रूपये मासिक तुटपुंज्या मानधनातून हा ऑनलाइनचा खर्च त्यांना आर्थिक अडवणीत आणणारा ठरत आहे.

पूर्व प्राथमिक शिक्षणाची सुरुवात बालवाडीपासून होते. म्हणूनच ग्रामीण भागात शिक्षणाचे उगमस्थान म्हणून अंगणवाडीकडे पाहिले जाते. शासनाने प्रत्येक गावी अंगणवाडी उघडून तेथे बालकांना धडे देण्यासाठी एक अंगणवाडी सेविका व एक मदतनीसांची नेमणूक केली आहे. कॉन्व्हेंट संस्कृतीला रोखण्याची मोठी जबाबदारी या अंगणवाडी सेविकांवर आली आहे. मात्र आता अंगणवाडी केंद्राच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुकास्तरावर बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय आहे. अंगणवाडी सेविकांकडे इतर कामे मोठ्या प्रमाणात या कार्यालयात एक तज्ज्ञ संगणक ऑपरेटर देण्याची गरज आहे. म्हणजे हा ऑपरेटर तालुक्यातील सर्व अंगणवाडी सोपविली जात आहे. त्यांच्याकडे गावाचे कुटुंब सेविकांना ऑनलाईनच्या कामात मदत करू शकतील. त्यामुळे सेविकेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, सर्वेक्षण मुलांची दैनंदिनी, गरोदर माता व स्तनदा मातांची नोंदणी, गावातील किशोरवयीन मुलींची नोंदणी, लसीकरण, गृहभेटी आदी कामे अंगणवाडी सेविकांवर सोपविली आहे. अंगणवाडीतील मुलांना सकस आहार बनूवन त्यांना खाऊ घालणे आणि गावातील स्तनदा व गरोदर मातांना सकस आहार धान्याचे वाटप करणे, ही कामेही करावी लागत आहे. एवढेच नव्हे तर याच्या सर्व नोंदी ऑनलाईन नोंदावयाच्या आहेत.

त्यासाठी प्रत्येक अंगणवाडी सेविकेला एक पाहिजे तेवढे ज्ञान नाही. त्यांना ऑनलाईन माहिती पाठविणे म्हणजे अशक्यप्राय होत आहे. तसेच अनेक गावांमध्ये नेटची रेंजसुद्धा नसते, अशावेळी त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. कधी अॅपचा सर्व्हर काम करीत नाही. कधी मोबाईल हाताळताना संपूर्ण डाटाच डिलीट होत आहे. अशावेळी मात्र या सेविकांची डोकेदुखी वाढत आहे.

भ्रमणध्वनी संच पुरविण्यात आला आहे. इंटरनेट खर्चासाठी प्रतिमाह 400 रूपये देण्यात येत आहे. ही सर्व माहिती पाठविण्यासाठी एक अॅप देण्यात आले आहे. मात्र ही माहिती ऑनलाईन पाठविताना अंगणवाडी सेविकांना अनेक अडचणी येत आहे. बहुतांश अंगणवाडी सेविका वयस्कर व सातवी ते दहाविपर्यंत शिकलेल्या आहेत. त्यांना मोबाईलच्या ऑनलाईन कामांमुळे चांगलीच घाबरगुंडी  उडतांना दिसत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post