अफसर शेख
राजस्थान (Rajasthan) येथील बाडमेर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. या जिल्ह्यातील 19 जणांना साप चावला आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे असे डॉक्टरांनी सांगितले आहे. परंतु या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या राज्यात बिपरजॉय चक्रीवादळाचा कहर सुरु आहे. ठिकठिकाणी पुराचे पाणी साचले आहे. विजेचे खांब कोसळले असल्याने विजेचा पुरवठा खंडित झाला आहे. पावसाचे पाणी बिळात शिरल्याने साप बाहेर येऊ लागले आहेत. बाडमेर जिल्ह्यातील धारासर, चाडार, नवातला जेतमाल गंगाला, उपरला तसेच खारिया राठोडान, सनाऊ, कापराऊ आणि सादुल या गावातील लोकांना सापाने चावा घेतला आहे.
Tags
देश-विदेश
.jpg)