जिल्हा परिषद निधीतून पेव्हिंग ब्लॉक बसवणे कामाचा भूमिपूजन..!

 



तौफिक शेख प्रतिनिधी

लोणी काळभोर येथील जिल्हा परिषद शाळा नंबर एक दोन तीन येथील मैदानामध्ये जिल्हा परिषद  निधीतून पेव्हिंग ब्लॉक बसवणे कामाचा भूमिपूजन करण्यात आले. चालू शैक्षणिक वर्षा मध्ये लवकरात लवकर चांगल्या प्रकारचा दर्जेदार पेविंग ब्लॉक बसवून मैदान या ठिकाणी तयार होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने हवेली चे जेष्ठ नेते माधव अण्णा काळभोर महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर पोलीस पाटील लक्ष्मण दादा काळभोर पंचायत समिती सदस्य सनी काळभोर सरपंच योगेश काळभोर उपसरपंच ललिता काळभोर माजी उपसरपंच राजेंद्र काळभोर ग्रा.पं.सदस्य नागेश काळभोर ग्रा.पं.सदस्य गणेश कांबळे ग्रा.पं.सदस्य राहुल काळभोर, अमित काळभोर ग्रा.पं.सदस्या सविता लांडगे  ग्रा.पं.सदस्या ज्योती काळभोर ग्रा.पं.सदस्या भारती काळभोर,जुबेदा शेख व इतर मान्यवर व पालक माता भगिनी शिक्षक हेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post