कर्जत प्रतिनिधी:-दिलीप अनारसे
कर्जत तालुक्यातील अंबिजळगाव येथील अनारसे वस्ती वर जिल्हा प्राथमिक शाळेसाठी कायम स्वरुपी शिक्षक मिळण्यासाठी पालक वर्गातून गटशिक्षण विभागात मागणी केली आहे. अनारसे वस्ती वरील प्राथमिक शाळेत चाळीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.मागील वर्षाच्या कालावधीपासून कायमस्वरूपी शिक्षक नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे शिक्षण विभागाने दोन शिक्षक दिले असून ते वेळेवर येत नाहीत.
मुलांना शिक्षण वेळेत दिले तर मुलांच्या प्रगतीसाठी योग्य राहील. तुम्हाला पालकांचे जे काही सहकार्य लागेल ते आम्ही लोक वर्गणीतून सहकार्य केले जाईल पण आमच्या मुलांचे नुकसान झाले नाही पाहिजे - पालक तुकाराम अनारसे,
गेली दोन दिवसांत आमच्या शाळेसाठी दोन शिक्षक कायमस्वरूपी मिळावेत यासाठी शिक्षण अधिकारी यांच्याशी चर्चा करून आम्हाला नेमित वेळेत मिळावे अशी मागणी करण्यात आली.नाहीतर आम्ही सर्व पालक २३जुन रोजी सकाळी १०वाजता शाळेला कुलूप लावणार असल्याचे सांगितले होते. वेळोवेळी आम्ही पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल करुन सुद्धा शिक्षण विभाग या बाबींकडे जाणीव पूर्वक नुसती बघ्याची भूमिका घेतली दिसत आहे - गोपाळ अनारसे
जे या शाळेसाठी शिक्षिकांची नेमनुक केली आहे ते रजेवर असल्याने थोड्या दिवसात शिक्षक वेळेत हजर होतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेता तातडीने शाळेसाठी दोन कायमस्वरूपी चे शिक्षक देण्यात येतील तालुक्यातील ६३शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने अडचण येत आहे. तरीही शाळेला शिक्षक स्टाफ उपलब्ध करून देण्यात येतील असे तोंडी आश्वासन कर्जत गटशिक्षणाधिकारी मिना शिवगुंडे यांनी पालकांना दिली.
यावेळी गोपाळ अनारसे, नितीन अनारसे, गणेश अनारसे, सुभाष अनारसे, भागवत अनारसे,नबीभई पठाण, धनंजय अनारसे, तुकाराम अनारसे, रेवनाथ अनारसे, युवराज अनारसे, विनोद अनारसे, अनिल अनारसे,गोदराम अनारसे, सचिन अनारसे,डिगांबर अनारसे, डॉ,माधव अनारसे, दत्तात्रय अनारसे, व अनारसे वस्तीवरील ग्रामस्थ उपस्थित होते.


