प्रतिनिधी अन्सार शेख
रिसोड :-स्थानिक वाशीम रोडला लागून राधाकृष्णा हॉस्पिटल समोरील शासकीय जागा मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमण धारकाच्या रडारवर होती.वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून ती जगा हडपण्याचा प्रयत्न काही जणांकडून झाला होता.परंतु रिसोड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंग ठाकूर यांच्या पुढाकाराने सदर जागेचा उपयोग वाहतूक पोलीस चौकीसाठी करण्यात आला आहे.यामुळे अतिक्रमण होण्याची व वाद होण्याची भीती संपुष्ठात आली आहे.या कामासाठी ठाणेदारांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल समाजिक सदभावना संघ यांच्यावतीने ठाकूर यांचा २३ जुन च्या सायंकाळी सत्कार करण्यात आला.या जागेच्या सुशोभनीकरणासाठी समता फौंडेशन ची मदत घेऊन वृक्षारोपण करुन व नागरिकांना बसण्यासाठी बाकसुद्धा टाकण्यात आले.शहराच्या अतिशय मोक्याच्या ठिकाणची जागा अतिक्रमीत न होता त्याठिकाणी प्रशासनाला उपयोगी पडेल अशी पोलीस चौकी झाल्यामुळे ठाणेदार यांचे कौतुक होत आहे.ठाकूर यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना सत्काराच्या निमित्त्ताने समाजिक सदाभावना समूहाच्या वतीने त्यांना विशेष धन्यवाद दिले.प्रसंगी माजी नगराध्यक्ष प्रा.विजयराव तुरुकमाने,प्रा.रंगनाथ धांडे,प्रा.रवि अंभोरे,शंकरराव माटे,माजी सैनिक रामभाऊ अंभोरे,मा.सैनिक कैलास कळासरे,माजी जीप सदस्य राजू भाऊ मोरे, रामकृष्ण अंभोरे,माजी सैनिक कपिल वाठोरे,माजी नगरसेवक अलंकार खैरे,ऍड दशरथ मोरे,संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष गोपाल पाटील खडसे,भूमिपुत्र संघटनेचे केशव गरकल,मंचकराव देशमुख,प्रा.अशोकराव देशमुख,भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सचिव मंदाताई वाघमारे,दादाराव अंभोरे,मंचक वाठोरे,सिद्धार्थ लेमाडे,कैलास धांडे,एस के सूर्यवंशी,भारत तुरुकमाने,सुनील गवई,अनिल झरे,राऊत सर,विवेकानंद ठाकरे,रेणुका आयुर्वेदलय चे शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन प्रा रवि अंभोरे यांनी केले तर आभार अलंकार खैरे यांनी मानले.
