कारंजा- महादेव तायडे
वसुधैव कुटुम्बकम या भारतीय तत्त्वज्ञानावर आधारित जी- 20 कार्यक्रमाचे आयोजन 19 ते 22 जून दरम्यान पुणे येथे करण्यात येणार आहे.त्या अनुशंगाने प्राथमिक शिक्षणाधिकारी राजेन्द्र शिंदे व योजना शिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांच्या मार्गदर्शनात राज्याच्या वेळापत्रका नुसार वाशिम जिल्ह्यात 1 ते 15 जून दरम्यान विविध शैक्षणिक उपक्रम राबविन्यात येत आहेत.त्यानुसार यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयात मुख्याध्यापक विजय भड यांच्या उपस्थितीत दिनांक 11 जून रोजी पुस्तकाचा खजिना- ग्रंथालयला भेट हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविन्यात आला.
शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे व टिकविणे या उपक्रमाचे अंतिम ध्येय आहे. त्याअंतर्गत 1 ते 15 जूनदरम्यान शाळास्तरावर घेण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाला, येवता केंद्रातंर्गत येणाऱ्या श्री बाबासाहेब धाबेकर विद्यालय, यावर्डी या शाळांमध्ये पुस्तकाचा खजिना या उपक्रमास उन्हाळी सुट्टी असून देखील शिक्षकांनी केलेल्या आवाहनानुसार विद्यार्थी उत्कृष्ट प्रतिसाद देत आहेत.
पुस्तकाचा खजिना उपक्रमांतर्गत आज शिक्षक गोपाल काकड यांनी विद्यार्थ्यांना शाळेच्या ग्रंथालयातील पुस्तकाचा परिचय करुण दिला.पुस्तकाचे मानवी जीवनातील महत्व याबद्दल विद्यार्थ्यांचे चर्चा करून पुस्तकाचे महत्व पटवून दिले.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापक विजय भड यांच्या मार्गदर्शनात गावातील सार्वजनिक अभ्यासिका व वाचनालयला भेट देऊन ग्रंथालयातील पुस्तका बद्दल माहिती घेतली आणि विद्यार्थी व पुस्तक यांचा संबंध पटवून दिला. यावेळी गोपाल काकड, राजेश शेंडेकर हे शिक्षक तर देविदास काळबांडे,भालचंद्र कवाने,राजू लबडे, राजेन्द्र ऊमाळे,राजेश लिंगाटे हे शिक्षकेत्तर कर्म.उपस्थित होते.

