प्रतिनिधी शेख अन्सार
रिसोड- रिसोड तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील शेतकरी व गावकऱ्यांच्या विद्युत समस्या भाजप नेते ॲड नकुल देशमुख यांनी महावितरण कार्यालय रिसोड येथे जाऊन सोडविल्या.
वाढिव विजबिलाच्या समस्या,नवीन वीज कनेक्शन साठी अर्ज करूनही वीज मीटर बसले नाहीत,शेतकऱ्यांनी समूहाने व खाजगी रोहित्र यासाठी आवश्यक ती कागदपत्र व इतर प्रक्रिया पुर्ण करूनही रोहित्र उपलब्ध झाले नाही किंवा यादीत नाव आल्या नंतर ही हे बसविले गेले नाही.वादळी वारा आणि इतर कारणाने तालुक्यातील अनेक गावात विद्युत खांब उखडून पडलेत त्या अभावी अनेक गावात वीज पुरवठा खंडित झालेला आहे.तसेच अनेक शेतकऱ्यांनी नवीन वीज जोडणी अर्ज करूनही त्यांना वीज जोडणी केल्या गेली नाही यासहित अनेक विद्युत संबधित समस्या रिसोड तालुक्यात व शहरात मोठ्या प्रमाणावर निर्देशास येत होत्या त्या संदर्भात महावितरण कार्यालयात तालुक्यातील व रिसोड शहरातील लोकांना घेऊन भाजपचे रिसोड विधानसभा निवडणुक प्रमुख ॲड.नकुल देशमुख यांनी विद्युत संबधित समस्या असलेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना घेऊन महावितरण कार्यालय गाठून शेकडोच्या संख्येने आलेल्या नागरिक व शेतकरी बांधवांच्या समस्यांवर अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली,काही समस्या ह्या तत्काळ अधिकाऱ्याकडून सोडवून घेतल्या, काही समस्या मधील तांत्रिक बाबी समजून घेतल्या. काही लगेच मार्गी लागणारी प्रकरणे अधिकाऱ्यांना त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्युत खांबाचे नुकसान झाले आहे.सध्या शेतीच्या मशागतीचे दिवस असून शेतकऱ्यांना मान्सूनच्या आगमनाची वाट आहे. पावसाने हुलकावणी दिल्यास ओलित करण्यासाठी विद्युत पुरवठा अत्यंत गरजेचा असून पावसाळा सुरू झाला तर पडलेले विद्युत खांब पूर्ववत उभे व दुरुस्ती करणे कठीण जाईल.
याबाबत शेतकऱ्यांनी महावितरणला वारंवार माहिती देऊन सुद्धा शेतातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही. त्यामुळे आज शेतकऱ्यांवर ओढवलेली परिस्थिती ॲड.नकुल देशमुख यांनी अधिकाऱ्यांना सांगितली.शेतकऱ्यांची समस्या व महावितरणच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांना पुढे येणाऱ्या अडचणी याबाबत अवगत केले. यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेत शिवारातील नुकसानग्रस्त विद्युत खांबांच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याबाबत आश्वस्त केले.तसेच कृषी व गावठाणचे नादुरुस्त ट्रान्सफार्मर दुरुस्त करण्यासंदर्भात,कृषी व खाजगी पेड पेंडींग कनेक्शन, ट्रान्सफार्मरची क्षमता वाढ,विद्युत खंबे आणि इतर पायभूत सुविधा कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी.यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुभाषराव शिंदे,बाळासाहेब देशमुख,माजी सभापती सुभाषराव खरात माजी जिल्हा परिषद सदस्य स्वप्निल सरनाईक,जिल्हा परिषद सदस्य अमोल पाटील, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत खाडे,भूषण पाटील,रवि आढाव,वानखेडे सर,माजी सभापती बबनराव हरीमकर,शिवाजीराव सरनाईक,प्रल्हादराव सोनुने,मुंडे सर अल्ताफ भाई, ॲड.गजाननराव देशमुख,प्रा.वसंतराव देशमुख,बबनराव कांबळे,श्रीराम बोरकर,महादेव अप्पा काष्टे,गजाननराव बोडखे,अपंग सेल भाजप तालुकाध्यक्ष अक्षय सानप सहित मान्यवर मंडळी उपस्थित होती.यावेळी भाजप नेते ॲड नकुल दादा देशमुख यांनी रिसोड तालुक्यातील विद्युत संबधित समस्या सोडविण्यासाठी घेतलेला पुढाकार व तत्काळ समस्याचे केलेले निवारण व समस्या सोडविण्यासाठी केलेल्या सूचना याबद्दल तालुका भरातून आलेले शेतकरी,गावकरी नागरिक यांनी समाधान व्यक्त करून या कार्याचे कौतुक केले.
