कारंजा- महादेव तायडे
वसुधैव कुटुम्बकम या भारतीय तत्त्वज्ञानावर आधारित जी- 20 कार्यक्रमाचे आयोजन 19 ते 22 जून दरम्यान पुणे येथे करण्यात येणार आहे.त्या अनुशंगाने प्राथमिक शिक्षणाधिकारी राजेन्द्र शिंदे व योजना शिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांच्या मार्गदर्शनात राज्याच्या वेळापत्रका नुसार वाशिम जिल्ह्यात 1 ते 15 जून दरम्यान विविध शैक्षणिक उपक्रम राबविन्यात येत आहेत.त्यानुसार यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयात मुख्याध्यापक विजय भड यांच्या उपस्थितीत दिनांक 12 जून रोजी चित्र काढणे,चित्र प्रदर्शन या जी 20 उपक्रमा अंतर्गत चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
सदर स्पर्धेत 22 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.त्यापैकी वेदिका निरंजन करडे हिचा प्रथम क्रमांक, नियती संतोष घोडराव हिचा द्वितीय क्रमांक, अमृता राजू बोनके हिचा तृतीय क्रमांक तर नंदिनी सिद्धार्थ इंगोले व प्राची हिम्मत आंडोळे यांना प्रोत्साहन पर क्रमांक देण्यात आला.
शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे व टिकविणे या उपक्रमाचे अंतिम ध्येय आहे. त्याअंतर्गत 1 ते 15 जूनदरम्यान शाळास्तरावर घेण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाला, येवता केंद्रातंर्गत येणाऱ्या श्री बाबासाहेब धाबेकर विद्यालय, यावर्डी या शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा या उपक्रमास उन्हाळी सुट्टी असून देखील शिक्षकांनी केलेल्या आवाहना नुसार विद्यार्थी व पालकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला.
चित्रकला स्पर्धा या उपक्रमांतर्गत आज शिक्षक अनिल हजारे व गोपाल काकड यांनी विद्यार्थ्यांना जी-20 बाबत चित्र काढणे व ते रंगवने या बाबत मार्गदर्शन केले.या उपक्रमासाठी मुख्याध्यापक विजय भड शिक्षक राजेश शेंडेकर यांच्यासह गोपाल काकड, अनिल हजारे हे शिक्षक तर देविदास काळबांडे,भालचंद्र कवाने,राजू लबडे, राजेन्द्र ऊमाळे,राजेश लिंगाटे हे शिक्षकेत्तर कर्म.उपस्थित होते.
