अहमदनगर अफसर शेख
शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनाला देश -विदेशातून भाविक येतात. हे भाविक साईंच्या झोळीत रोख रकमेसह, मोठं दान करतात. मात्र पुणे येथील दानशूर साईभक्त दीपक सरगळ यांनी साईंच्या चरणी तब्बल २५०० किलो आंबे दान केले आहेत.
सध्या आंब्यांचा सिजन असल्याने या साईभक्ताने संस्थानला दान दिलेल्या २५०० किलो आंब्यांमुळे साईभक्तांना आज आमरसाची मेजवानी देण्यात आली. मागील वर्षी सुध्दा याच साईभक्ताने ५ हजार किलो आंबे दान केले होते.
*भाविकांना आमरसाचे भोजन*
साई संस्थानने भोजनालयात या आंब्याचा थंडगार आमरस तयार केला. केसर जातीच्या आंब्याचा रस आज बनविण्यात आला. साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात सकाळपासून भाविकांना आमरसाचे मिष्ठान्न भोजन देण्यात आले.साईभक्तांना सुद्धा हा सुखद धक्का ठरला आहे.
Tags
धार्मिक
