कारंजा- महादेव तायडे
वसुधैव कुटुम्बकम या भारतीय तत्त्वज्ञानावर आधारित जी- 20 कार्यक्रमाचे आयोजन 19 ते 22 जून दरम्यान पुणे येथे करण्यात येणार आहे.त्या अनुशंगाने प्राथमिक शिक्षणाधिकारी राजेन्द्र शिंदे व योजना शिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांच्या मार्गदर्शनात राज्याच्या वेळापत्रका नुसार वाशिम जिल्ह्यात 1 ते 15 जून दरम्यान विविध शैक्षणिक उपक्रम राबविन्यात येत आहेत.त्यानुसार यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयात मुख्याध्यापक विजय भड यांच्या उपस्थितीत दिनांक 10 जून रोजी आपणच गणित तयार करूया,बोली भाषेत शाब्दिक उदाहरने हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविन्यात आला.
शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे व टिकविणे या उपक्रमाचे अंतिम ध्येय आहे. त्याअंतर्गत 1 ते 15 जूनदरम्यान शाळास्तरावर घेण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाला, येवता केंद्रातंर्गत येणाऱ्या श्री बाबासाहेब धाबेकर विद्यालय, यावर्डी या शाळांमध्ये आपणच गणित तयार करूया या उपक्रमास उन्हाळी सुट्टी असून देखील शिक्षकांनी केलेल्या आवाहनानुसार विद्यार्थी व पालकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला.
आपणच गणित तयार करूया या उपक्रमांतर्गत आज गणित शिक्षक राजेश शेंडेकर यांनी विद्यार्थ्यांचे शाब्दिक उदाहरणे कशी तयार करावी? व ते कशा पद्धतीने समजून घेऊन सोडवावे? शाब्दिक गणिताचे को कोणते प्रकार आहेत? याबद्दल विद्यार्थ्यांचे चर्चा करून विद्यार्थ्याकडून शब्दीक गणित तोंडी पद्धतीने सोडवून घेतले.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापक विजय भड गणित शिक्षक राजेश शेंडेकर यांच्यासह गोपाल काकड, अनिल हजारे हे शिक्षक तर भालचंद्र कवाने,राजू लबडे, राजेन्द्र ऊमाळे,राजेश लिंगाटे हे शिक्षकेत्तर कर्म.उपस्थित होते.
