रिसोड पोलिस स्टेशन मधे शांतता समितीची सभा संपन्न



प्रतिनिधी अन्सार शेख

रिसोड : येथील  पोलीस स्टेशन मधे शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सद्यस्थितीत सोशल मीडिया मुळे होत असलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत ठाणेदार यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. आपल्या आजूबाजूचे सोशल मीडिया युजर्स यांच्यावर लक्ष ठेवून आक्षेपार्ह बाब आढळून आल्यास तात्काळ पोलीस स्टेशन येथे संपर्क करण्याबाबत सूचना दिल्या. कोणताही अनुचित प्रकार हाताळण्यास पोलीस यंत्रणा सक्षम असून कुणीही कायदा हातात घेऊ नये. तसेच सोशल मीडियाच्या वापरावर पोलिसांचे लक्ष असून कोणतीही पोस्ट शहनिशा केल्याशिवाय किंवा इतरांच्या भावना दुखावतील अशा पोस्ट व्हायरल करू नये करू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर यांनी केले. सदर मीटिंग करिता पोलीस पाटील, पत्रकार मंडळी, शांतता समिती सदस्य   हजर होते. यावेळी बाळासाहेब खरात, पत्रकार मोहनराव देशमुख, शंकरराव हजारे, वसमतकर सर, रवी अंभोरे सर, काशिनाथ कोकाटे, जुल्फीकारभाई, फैयाज अहमद, धांडे सर यांनी  मनोगत व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post