सातारकर महाराजांच्या पालखीचा नगर प्रदक्षिणा



प्रतिनिधी अन्सार शेख

रिसोड : येथील श्री संत सातारकर महाराज संस्थानतर्फे 10 रोजी शहरातील सातारकर महाराजांच्या पालखीची नगरप्रदक्षिणाकेली गेली दुपारी 12:00 वाजता पालखी मंदिरातून निघत अष्टभुजा देवी चौक मुल्लागल्ली, आसन गली, छत्रपती शिवाजी महाराज चौक,नवीन सराफा लाईन , चांदणी चौक , जुनी सराफा लाईन , पंचवट मार्गे मंदिरात पोहचली , तेथे धार्मिक विधी नंतर पालखीची सांगता करण्यात आली.  यावेळी भक्तिगीते आणि भक्तांच्या जयघोषाने शहर दुमदुमून गेले होते.पालखीचे दर्शन घेण्यासाठी शहरातील भक्त रस्त्यावर आले.  या पालखीत महिला मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post