कारंजा :- महादेव तायडे
दि ८जून रोजी ग्राम जयपूर येथे सकाळी ९ वा. तालुकास्तरीय बी बी एफ तंत्रज्ञान प्रशिक्षण पार पडले. परीसरातील शेतकऱ्यांना बी बी एफ पेरणी चे महत्व व तंत्रज्ञान अचुकपणे कळावे याकरीता विजयपथ शेतकरी गटाने कृषी विभाग व पानी फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्या सौ.वैशालीताई काळे यांची उपस्थिती होती तर विशेष अतिथी म्हणुन तहसीलदार कुणाल झाल्टे उपस्थित होते. प्रमुख तज्ञ मार्गदर्शक म्हणुन बी बी एफ तंत्रज्ञानाचे प्रवर्तक, राज्य शासनाच्या प्रतिष्ठित शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित दिलीप फुके ,प्रमुख अतिथी म्हणुन नोडल अधिकारी स्मार्ट वाशिम संतोष वाळके ,तालुका कृषी अधिकारी संतोष चौधरी ,पत्रकार विजय काळे ,संजय भगत ,राहुल रविराव ,मंडळ कृषी अधिकारी रविंद्र जटाळे ,अतुल क्षीरसागर,पानी फाउंडेशन विभागीय समन्वयक उज्वल बोलवार ,विजयपथ शेतकरी गटाचे अध्यक्ष विजय पाटील काळे ,कृषी पर्यवेक्षक गुणवंत ढोकणे,तालुका समन्वयक रविंद्र लोखंडे ,प्रशिक्षक गजानन गांजरे ,कृषी सहाय्यक नरेंद्र फुके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्तविकातुन संतोष चौधरी यांनी प्रशिक्षणाचे महत्व विषद केले. .
कारंजा तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांना बी बी एफ तंत्रज्ञानाने पेरणी करण्याचे आवाहन केले. तसेच शासन आपल्या दारी या योजनेविषयी सविस्तर माहिती दिली व पी एम किसान योजने अंतर्गत बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी ई-केवाईसी तसेच आधार लिंक करण्याचे आवाहन त्यांनी केले.
संतोष वाळके नोडल अधिकारी स्मार्ट प्रकल्प वाशिम यांनी स्मार्ट प्रकल्पांतर्गत योजनांची माहिती तथा बी बी एफ पेरणी चे महत्व समूह खेळ घेऊन समजावून दिले.
दिलीप फुके यांनी बी बी एफ यंत्रधारक मालक व चालक यांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. तसेच चालक व शेतकरी यांनी बी बी एफ पेरणी करतांना घ्यावयाची दक्षता विषद केली. व उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन समाधान केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक गुणवंत ढोकणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी सहायक नरेंद्र फुके ,विजयपथ शेतकरी गट,व पानी फाउंडेशन टीम ने विशेष परिश्रम घेतले.
संचालन गुणवंत ढोकणे यांनी तर आभार प्रदर्शन विजय पाटील काळे अध्यक्ष विजयपथ सोयाबीन उत्पादक गट यांनी केले.याप्रसंगी जयपुर येथील विजयपथ सोयाबीन उत्पादक शेतकरी गट ,प्रगती महीला शेतकरी गट ,परिसरातील ट्रॅक्टर चालक ,मालक ,शेतकरी तथा कृषी विभागाचे अधिकारी ,कर्मचारी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*महीला गटाच्या रणरागिनिने वेधले सर्वांचे लक्ष*
बी बी एफ प्रात्यक्षिका दरम्यान जयपुर येथील प्रगती महीला शेतकरी गटाची सदस्या दिपाली मकेश्वर हिने चक्क स्वतः ट्रॅक्टर चालऊन बी बी एफ पेरणी करून उपस्थितांना चकीत केले. व सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात तिचे कौतुक केले. प्रगती महिला शेतकरी गट यावर्षी फार्मर कप स्पर्धेत सहभागी असुन त्यांनी बी बी एफ द्वारे सोयाबीन -तुर पेरणी करण्याचा निर्णय घेतला आहे हे विशेष.
*विजयपथ शेतकरी गटाचा हा स्तुत्य उपक्रम- उज्वल बोलवार*
विजयपथ शेतकरी गटाने पुढाकार घेऊन कृषी विभाग व पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत केलेले हे प्रशिक्षण हा स्तुत्य उपक्रम असुन परीसरातील शेतकऱ्यानंमध्ये बी बी एफ बाबत जनजाग्रुति होऊन अचुक व तंत्रशुद्ध बी बी एफ पेरणी करीता फायद्याचे ठरेल यात शंका नाही.

