भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे सोमवार दि.26 जुन पासुन कँपेन




  रिसोड :  सरकार आपल्या दारी' या अभियाना च्या माध्यमातून सरकार विविध योजना आणि कामांची प्रसिद्धी प्रशासनाला हातत धरून समाजात करीत आहे. पंरतु पुर्ण पणे शेतकऱ्यांचा विसर पडलेल्या शासन व राज्यकर्त्यांना जागे करण्यासाठी व विविध शेतकरी प्रश्नांची आठवण करून देण्यासाठी सोमवार दिनांक 26 जुन पासुन  *'कशाला येता दारी '* हे कँपेन भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून  चालविले जाणार आहे.  राज्यभरातील भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सोशल मिडीया, प्रींट मीडिया, इलेक्ट्रो मिडीयाच्या माध्यमातून हे अभियान राबविणार आसल्याची माहीती भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना खर्या अर्थाने ज्या बाबींची आज गरज आहे ते न करता सरकार समाजाची आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. त्यामुळे  'कशाला येता दारी' हे अभियान भूमिपुत्र कडुन हाती घेण्यात आले आहे. 'शासन आपल्या दारी' हे अभियान जो पर्यंत चालेल तो पर्यंत भूमिपुत्र कडुन 'कशाला येता दारी' हे अभियान चालवले जाणार आहे.



'सोयाबीन ला भाव नाही...

      कशाला येता दारी'...


'कापसाला भाव नाही.. 

     कशाला येता दारी'.... 


'कांद्याला भाव नाही...

     कशाला येता दारी'....


'हरबर्याला भाव नाही

      कशाला येता दारी'.....


'शेत मालाचे भाव पाडण्यासाठी स्टाॅक लीमीट लावले 

      कशाला येता दारी'....


'आतीवृष्टी, सततचा पाऊस, पीकविम्याचा मोबदला नाही...

      कशाला येता दारी'..  

      

'पीककर्ज नाही, सीबील ची अट रद्द नाही...

      कशाला येता दारी'....

 

'मोफत व मुबलक कृषी पंपाला विज नाही...

     कशाला येता दारी'.... 

    

 'शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत....

       कशाला येता दारी'.....

     वरील प्रमाणे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाची जाण ' सरकार आपल्या दारी' या सरकारच्या अभियानातच करून दिली जाणार  असल्याची माहीती भूमिपुत्र कडुन देण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post